शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

कोएसोचा दहावीचा निकाल ८९.३६ टक्के

By admin | Published: June 14, 2017 3:11 AM

कोकणातील अग्रगण्य कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ८९.३६ टक्के लागला आहे. संस्थेच्या मराठी माध्यमाच्या ४६ तर इंग्रजी माध्यमाच्या ५ अशा एकूण ५१ शाळा आहेत.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

कोकणातील अग्रगण्य कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ८९.३६ टक्के लागला आहे. संस्थेच्या मराठी माध्यमाच्या ४६ तर इंग्रजी माध्यमाच्या ५ अशा एकूण ५१ शाळा आहेत. त्यापैकी चार शाळांचा निकाल १०० टक्के, २३ शाळांचा निकाल ९० टक्केपेक्षा अधिक, २४ शाळांचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक, ५ शाळांचा निकाल ७० टक्केपेक्षा अधिक तर ४ शाळांचा निकाल ६० टक्केपेक्षा अधिक लागला आहे.१०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये संस्थेच्या उरण तालुक्यातील घारापुरी बेटावरील कोएसो माध्यमिक शाळा,घारापुरी शाळेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वसोली-कुडाळ येथील को.ए.सो. यशवंत राघोजी परब विद्यालय, कोएसो शाळा,घोसाळे, कोएसो वीणा पंडित तेंडुलकर इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळा,रोहा या चार शाळांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दहावी परीक्षेत पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी भरारी घेतली आहे. पी.एन.पी. होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल वेश्वी, जीजेएम इंग्लिश मिडीयम स्कूल खालापूर, पी.एन.पी. मराठी माध्यम शाळा वेश्वी, माध्यमिक शाळा चौल, माध्यमिक शाळा वडघर पांगळोली, माध्यमिक शाळा जांबरु ग, माध्यमिक शाळा पाष्टी, माध्यमिक शाळा सुतारपाडा या आठ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेमध्ये पी.एन.पी. मराठी माध्यम शाळा वेश्वी, या शाळेची विद्यार्थिनी मानसी राजेश म्हात्रे ९०.२० टक्के गुण संपादन करून संस्थेत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.उर्वरित शाळेचे निकाल ९० टक्केच्या वर लागले असून पी.एन.पी. संस्थेचा निकाल ९० टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्रशासन अधिकारी अमित देशपांडे यांनी अभिनंदन केले. कुरुळ येथील सुधागड एज्यु.माध्यमिक शाळेचा निकाल ८२.७५ टक्के लागला असून राहुल प्रकाश पाटील हा ८० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला आहे. साक्षी अजय दास (७८.४०टक्के) दुसरी, परेश प्रमोद घरत (७७.८०टक्के) तिसरा, हेमरु सुधाकर घाडगे (७६.६०) चौथा तर उषाकुमारी शंभूप्रसाद मेहता (७५.८०टक्के) हिने शाळेत पाचवा क्रमांक पटकावला असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता प्रसाद पाटील यांनी दिली. शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे प्रमुख अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. अ‍ॅड.दत्ता खानविलकर एज्युकेशन ट्रस्ट संचालित चिंतामणराव केळकर विद्यालयाचा यंदा सलग पाचव्या वर्षी देखील १०० टक्के निकाल लागला आहे. मराठी माध्यमात चिन्मयी जुईकर ९४.६० टक्के गुण मिळवून तर इंग्रजी माध्यमात अदिती सचिन पाटील ९४.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आले आहेत. शाळेतील ७० पैकी ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील ३८ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा अधिक तर दोन विद्यार्थ्यांनी ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अमर वार्डे यांनी दिली आहे.महाड येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महाड तालुक्यातील दाभोळ माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर संस्थेच्या महाडमधील आदर्श विद्यालयाचा निकाल ८१ टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांनी दिली. या दोन्ही शाळेतील विद्यार्थी बाहेरील शिकवणी वर्गात जात नाहीत. शाळेच्या शिक्षकांच्या माध्यमातूनच सर्व विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास करून घेतला जातो, असे अ‍ॅड.काळे यांनी सांगितले.