शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

आंबोली धरणामुळे शेती बहरली, पाणीटंचाईची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:38 PM

तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले

मुरुड : तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले. त्यानंतर पाणीटंचाई संपुष्टात आली याचबरोबर गतवर्षी शिघ्रे, उंदरगाव आणि आंबोली गाव येथील कालव्याची कामे पूर्ण झाल्याने यंदा या परिसरातील शेतीदेखील ऐन उन्हाळ्यात हिरवीगार झाली आहे.सध्या आंबोली धरणात प्रचंड पाणीसाठा असून तीन डोंगरांच्या मधोमध हे धरण बांधल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी सिंचन होऊन लोकांना येथून मुबलक पाणीपुरवठा होत असतो. मुरुड शहराला या धरणामधूनच पाणीपुरवठा झाल्याने मेअखेर असणारी पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. मुरुड तालुका हा नवाबकालीन तालुका असून या वेळी मुरुड शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नवाब राजांनी बांधलेले गारंबी धरण हा शहराला एकमेव आधार देणारे धरण होते. सुरुवातीला या शहराची लोकसंख्या फक्त सात हजार होती;परंतु आता हीच लोकसंख्या १६ हजारांच्या वर पोहचली असून येथे सलग सुट्ट्या पडल्यामुळे येणारे हजारो पर्यटक व त्यांना लागणारे पाणी ही खूप मोठी गंभीर समस्या आंबोली धरणामुळे आता संपुष्टात आली आहे. त्याचबरोबर ५०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.

मुरुडमध्ये वर्षाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त असून पावसाळ्यात किमान ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक शनिवार, रविवार या दिवशी येथे पाहावयास मिळतात. त्यामुळे पावसाळी हंगामात आंबोली धरण हे पर्यटकांचे आकर्षण स्थळ म्हणून सर्वत्र सुपरिचित झाले आहे. आंबोली धरण ज्या वेळी पावसाळ्यात ओव्हरफ्लो होते,त्या वेळी धरणातील पाणी जाण्यासाठी जो वेगळा मार्ग बनवला आहे तेथून ते पाणी एका चौकोनी हौदात साठून त्या पाण्याचा निचरा होत असतो. साठलेल्या या चौकोनी हौदात पर्यटक पोहण्याचा आनंद लुटत असतात.

आज स्थानिक शेतकरी या धरणातील पाण्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, मिरची, कोथिंबीर, कांदा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, चहा पत्ती, नारळ, सुपारी, आंबा, कलिंगडे,आदी महत्त्वाची पिके घेऊन येथील शेतकरी सधन होताना दिसत आहे. तसेच पर्यटकांमुळे या भागातील छोट्या छोट्या खानावळ व हॉटेल हा व्यवयास सुद्धा तेजीत आला आहे. एका धरणामुळे स्थानिक शेतकरी यांच्याबरोबर पर्यटनाला चालना मिळून लोकांना आर्थिक सुबत्ता येत आहे. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना मिळाला दिलासापर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच या धरणापासून किमान १० किलोमीटर परिसरात असणाºया गावांना सुद्धा पाणीपुरवठा होऊन काही निवडक कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील काही शेतकरी दुबार शेती सुद्धा करीत आहेत. एकंदर या धरणामुळे पर्यटक व स्थानिक शेतकरी यांना मोठा दिलासा मिळून सुमारे ५० हजार लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. या धरणातील पाणी असलेल्या कालव्यांद्वारे सोडण्यात यावे जेणेकरून जिथपर्यंत कालवे आहेत तिथपर्यंत हे पाणी जाऊन जमीन ओलिताखाली येऊ शकते. तसेच पाण्याचा निचरा होऊन जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरले जाईल व त्याचा फायदा कोरड्या पडलेल्या विहिरी व कूपनलिका यांना पाणी उपलब्ध होईल. यासाठी आंबोली धरणातील पाणी सोडावे अशी मागणी येथील काही शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नवीन कालवे काढण्यात येऊन या धरणाचे पाणी माझेरी, खोकरी, शीघ्रे, तेलवडे, वावडुंगी या मोठ्या ग्रामपंचायतींना पोहचवण्यात येऊन येथील जलसिंचन मर्यादा वाढवण्यात आल्यास येथील शेतकरी सुद्धा दुबार पीक घेण्याचा आनंद घेऊ शकतात.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणीDamधरण