‘जेरु सलेम गेट’ होणार ज्यू धर्मीयांचे सांस्कृतिक वारसा स्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 02:44 AM2018-11-14T02:44:04+5:302018-11-14T02:44:31+5:30
आवास येथे संग्रहालय उभारण्याची तयारी : राज्य सरकारचेही सहकार्य; विकासासाठी ट्रस्टची स्थापना
जयंत धुळप
अलिबाग : सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू लोक समुद्रमार्गे भारतात आले. ते प्रथम अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे उतरल्याची धारणा ज्यू धर्मीयांमध्ये आहे. येथूनच ते देशभरात पसरले. इस्राईलच्या निर्मितीनंतर त्यातील बहुतांश इस्राईलला स्थायिक झाले. ‘जेरु सलेम गेट’ या नावाने नवगाव येथे त्यांच्या आदिपुरु षांची स्मशानभूमी आहे. या ठिकाणाचा ‘ज्यू धर्मीयांच्या सांस्कृतिक वारसा स्थळ’ म्हणून विकास करण्याचा जागतिक ज्यू समुदायाचा प्रयत्न आहे.
जेरु सलेम गेटच्या सुशोभीकरणासह आवास येथे भारतीय जीवनपद्धतीची माहिती देणारे संग्रहालय उभारण्यासाठी ज्यू समुदायाने आता पुढाकार घेतला आहे. गतवर्षी ज्यू समुदायाचे शिष्टमंडळ नवगाव येथे आले होते, त्यानंतर राज्य शासनानेही त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. मुंबई विद्यापीठात झालेल्या ज्यू वारसा आणि सांस्कृतिक परिषदेत प्रा. हेल्टी बर्ग यांनीही संग्रहालयाची निर्मिती का आवश्यक आहे, या संदर्भात सविस्तर विवेचन केले होते. इंडिया ज्यू काँग्रेस आणि इस्राईलमध्ये स्थायिक झालेला ज्यू समाज एकत्र येऊन नवगाव येथे सांस्कृतिक वारसा स्थळाच्या उभारणीसाठी प्रयत्न करीत आहेत. मागील वर्षी मकरसंक्र ांतीच्या दिवशी कोकणच्या भूमीशी नाते सांगणाऱ्या जगभरातील ज्यू समुदायाचा एक गट आला होता. यामध्ये जॉनाथॉन मोझेस वाक्रुळकर, जॉनाथॉन सोलमन, जॉन पेरी पेझारकर, विजू पेणकर आदी समाजासाठी व्यक्ती होत्या.
नवगावमध्ये ‘जेरु सलेम गेट’ या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आली असून, पुरातत्त्व विभागाच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी इतिहासतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. रायगड जिल्ह्यात बेने इस्रायली म्हणून ओळखल्या जाणाºया लोकांनी आपल्या आश्रयभूमीशी असलेले नाते कायम ठेवलेले आहे. हे नाते अधिक वृद्धिंगत करण्याची त्यांची इच्छा असल्याने स्मृतिस्थळाच्या सुशोभीकरणाबाबत पाठपुरावा करीत असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
हिंदू समाजाबरोबर समरस
च्भारतात आश्रयाला आलेल्या यहुदी लोकांनी आपली वेगळी ओळख येथील हिंदू समाजाबरोबर समरस होऊन आजही कायम ठेवली. हे संग्रहालाच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न आहे.
च्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करीत आहोत. यासाठी आवास येथील जागेची पाहणी करण्यात आल्याचे ज्यू सांस्कृतिक परिषदेचे सदस्य हेल्टी बर्ग यांनी सांगितले.
ज्यू धर्मीयांचे ऋ णानुबंध वृिद्धंगत होणार
दरम्यान, संग्रहालयासाठी आवास आणि नवगाव येथील जागेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप जागा निश्चित करण्यात आलेली नाही. हे संग्रहालय तयार झाल्यास ज्यू धर्मीयांचे येथील ऋ णानुबंध अधिक वृद्धिंगत होतील, असा विश्वास अलिबाग ज्यू समाज अध्यक्ष हेलझेल भोनकर यांनी व्यक्त केला आहे.