अलिबाग : सतत खंडित होणाऱ्या बीएसएनएलच्या इंटरनेट ब्रॉडबॅण्ड सेवेसंदर्भात अनेक तक्रारी करून ही सेवा अद्ययावत करण्यात आली नसल्याने अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात आल्या नाहीत तर आंदोलनाचा पावित्रा घेण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.बीएसएनएल इंटरनेट ब्रॉडबॅण्ड सेवा नागरिकांना गेली कित्येक वर्षे पुरवित आहे. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून इंटरनेट ब्रॉडबॅण्ड सेवेच्या अनेक तक्रारींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महिन्यातून १० ते १५ दिवस इंटरनेटची सेवा कोलमडलेली असते, तरीही बिल मात्र जेवढे आहे, तेवढेच येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसत आहे.बीएसएनएलच्या इंटरनेट ब्रॉडबॅण्ड सेवेसंदर्भात नागरिकांनी कोणती तक्रार आमच्या कार्यालयात केली तर आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न हाताळण्यात येणार आहे. त्यामुळे गांभिर्याने हा प्रश्न लवकर सोडवा, अशी मागणी निवेदनाद्वारे अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी केले आहे.परिस्थिती जैसे थेबीएसएनएल कार्यालयात ग्राहकांनी वेळोवेळी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, आजही परिस्थिती जैसे थेच आहे.
बीएसएनएलच्या खंडित सेवेने ग्राहक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:47 AM