शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोलमडणा-या इंटरनेट सेवेमुळे ग्राहक संतप्तदोन महिन्यांपासून समस्या : हजारो ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 2:21 AM

वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

उरण : वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा, एनएडी, जासई, उरण शहर आदी विभागातील हजारो ग्राहकांना बसला आहे. एमटीएनएलच्या गलथान कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.खंडित झालेल्या इंटरनेट सेवेचा फटका येथील हजारो ग्राहकांबरोबरच परिसरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनाही बसला आहे. शासकीय कार्यालयाही सातत्याने बंद पडणा-या इंटरनेट सेवेचा फटका बसला आहे. त्याचा विपरीत परिणाम विविध शासकीय कार्यालये, बँकांच्या कामकाजावरही होऊ लागला आहे. त्याचा नाहक मनस्ताप मात्र नागरिक आणि ग्राहकांना होत आहे. याबाबत उरण एमटीएनएल कार्यालयाकडे विचारणा केली असता उरण-जासई, बेलापूर, करळ ब्रिज, उरण शहर परिसरात सातत्याने रस्त्यासाठी खोदकामे सुरू आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामांमुळे वारंवार आॅप्टीकल फायबरच्या केबल्स तोडल्या जात आहेत. त्यामुळेच उरणमधील इंटरनेट सेवा कोलमडत असल्याची माहिती एमटीएनएलचे उरण विभागाचे डीएम एल. आर. यादव यांनी दिली. याबाबत विचारणा केली असता उरण एमटीएनएलचे अधिकाºयांकडून टाळाटाळ करण्यातयेत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी एमटीएनएलच्या कार्यालयात जावून इंटरनेट सेवाच बंद करण्याचा इशारा देवू लागलेआहेत.वारंवार होणाºया इंटरनेट सेवा दुरुस्तीमध्ये अधिकारी वर्गालाच फारसे स्वारस्य नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्यात कामचुकार अधिकारीच जादा जबाबदार असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून केला जात आहे.बोर्ली पंचतनमध्ये नेटवर्कचे तीनतेरादांडगुरी : तंत्रज्ञान विश्वात इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य ग्राहक मोबाइलसाठी इंटरनेटचा वापर करतात. बोर्ली पंचतन, दिवेआगर, वडवली परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच सर्व मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क खंडित होत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.दिवेआगर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असून डिसेंबर, जानेवारीत हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात. मात्र सातत्याने नेटवर्क जात असल्याने पर्यटकांना व स्थानिकांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. मोबाइलचे नेटवर्क जाणे, फोन कट होणे, नेटवर्क संथ असल्यच्या अडचणी ग्राहकांना येत आहेत.तक्र ार करायची म्हटले तरी ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचाºयांकडून कोणत्याही समस्या सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे जलद चालणाºया कंपनीची सेवा शहरात मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड