शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

जिल्ह्यात सायबर क्राईम गुन्हे वाढले, २०२३ या वर्षात ४२ गुन्ह्यांची नोंद

By निखिल म्हात्रे | Published: February 02, 2024 2:27 PM

यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. इंटरनेटची उपलब्धता तसेच मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईमचे लोण सर्वत्र पसरले आहे. २०२३ या वर्षात रायगड जिल्ह्यात सायबर क्राईम निगडित ४२ गुन्हे घडले आहेत. यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

वाढते नागरिकरण तसेच आधुनिक जीवनशैली यामुळे जिल्ह्यात सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. इंटरनेट तसेच मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईम वाढत असल्याचे दिसून येते. सायबर क्राईमचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात सायबर सेल स्थापन करण्यात आला आहे. तसेच सायबर क्राईमसंबंधी वाढते गुन्हे लक्षात घेऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंबंधी तपास करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मात्र एवढे प्रयत्न करुनही सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. २०२३ मध्ये सायबर क्राईमचे ४२ गुन्हे घडले आहेत. यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. सायबर क्राईममध्ये परदेशातील तसेच परराज्यातील काही टोळ्या सक्रीय असल्याने पोलीसांना तपास करताना अडचणी निर्माण होत आहेत. 

सायबर गुन्हेगारीचे प्रकार -- सोशल साईट्सच्या माध्यमातून तरुण, तरुणींना ब्लॅकमेल करणं- नोकरीविषयक साईट्सवरुन नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणं- विवाहविषयक साईट्सवर नोंदणी करणाऱ्या महिलांची आर्थिक फसवणूक- ई-मेलवर माहिती मागवून त्यांची आर्थिक फसवणूक करणे- बँकेतून फोन केल्याची बतावणी करत खात्याची सर्व माहिती घेऊन त्याआधारे फसवणूक

लोकांचे दुर्लक्ष सायबर गुन्हे वाढण्यास कारणीभूत -अनोळखी माणसांना आपल्या एटीएमचा नंबर देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी अनेकदा केले आहे. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हे आवाहन करताना तसे संदेशही अनेकदा मोबाईलवरून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक आपला नंबर अनोळखी लोकांकडे देत आहेत. कुठल्याही बँकेचा मॅनेजर फोनवरून एटीएम नंबर विचारत नाही आणि तो विचारूही शकत नाही. याबाबत वारंवार बँकांकडून जागृती केली जाते. तरीही ग्राहक या फसवेगिरीला फसतो आणि दृष्टचक्रात अडकतो.

सोशल नेटवर्किंग साईटवर आपली संपूर्ण माहिती टाकू नका. अनोलखी माणसासोबत चॅटींग करताना त्याला आपले फोटो तसेच वैयक्तिक माहिती देऊ नका असे आवाहनही पोलीस करतात, मात्र याकडेही नागरिक दुर्लक्ष करतात, यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावत आहे. त्यामुळे नागरीकांनी आपल्याला आलेला ओटीपी कोणालाही  देऊ नये.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस