कर्जतमध्ये रंगला ‘सायकल कट्टा’; डोंबिवली ते गोवा ममता परदेशी यांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:34 AM2019-12-10T00:34:14+5:302019-12-10T00:34:34+5:30

प्रवासाला निघण्यापूर्वी रूट मॅप तसेच कोणकोणती गावे लागतात त्यातील कोणत्या गावात राहण्याची, खाण्याची सोया होऊ शकते याची माहिती घेतली होती.

 'Cycle katta' painted in Karjat; Travel from Dombivli to Goa Mamata Pardesi | कर्जतमध्ये रंगला ‘सायकल कट्टा’; डोंबिवली ते गोवा ममता परदेशी यांचा प्रवास

कर्जतमध्ये रंगला ‘सायकल कट्टा’; डोंबिवली ते गोवा ममता परदेशी यांचा प्रवास

googlenewsNext

कर्जत : आजपर्यंत तुम्ही मुंबई- गोवा असा प्रवास विमानाने, बोटीने, खाजगी वाहनाने अथवा जास्तीत जास्त मोटारसायकलने केला असेल मात्र डोंबिवलीच्या ममता परदेशी या महिलेने चक्क सायकलवरून डोंबिवली ते गोवा असा ५९० किलोमीटरचा प्रवास केला. एवढेच काय तर डोंबिवली ते हिमालय असे १७,९०० किलोमीटरचा खडतर प्रवास यशस्वी रित्या पूर्ण केला. या सारख्याच मीरा वैद्य, शशांक वैद्य तसेच रुपेश, अनंत, तुषार या सायकलस्वारांशी गप्पा मारण्यासाठी सायकल पटू प्रकाश पटवर्धन आणि संतोष दगडे यांनी ‘सायकल कट्टा’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी कर्जत मालवाडी येथील रॉयल कॅम्पमध्ये करण्यात आले होते.

सुरवातीला प्रशांत ननावरे यांनी या कार्यक्रमाचा हेतू , उद्दिष्ट सांगितले. सायकल चालविल्याने शरीराला तर व्यायाम तर मिळतोच आणि शक्य असेल तिथे मोटारसायकल ऐवजी सायकलने गेल्यास इंधनाची परिणामी पैशाची बचत होते. गाड्यांच्या धुरातून होणारे प्रदूषण ही रोखले जाते. बाहेरच्या अनेक देशात सायकलवरून कामाला जाणारे लोक आहेत असेही त्यांनी सांगितले. तेथे त्यासाठी सायकल ट्रॅक सुद्धा आहेत. त्यामुळे आपणही जास्तीत जास्त सायकलचा वापर केला पाहिजे असे मत व्यक्त के ले.

निवेदक कपिल केळकर यांनी ममता परदेशी यांचा डोंबिवली ते गोवा आणि हिमालय या प्रवासाबाबत ममता यांना बोलते केले. यावेळी ममता यांनी मी कधीच यापूर्वी गोव्याला गेले नव्हते. मात्र सायकल चालवायची आवड होती आणि आपण काय तरी वेगळे करायचे या जिद्दीने सायकल वरून गोव्याला जायचे ठरवले. त्यासाठी दररोज सायकलिंगचा सराव केला. लग्न झालेले असल्याने संसार,पती, मुलगा या सर्वांची संमती घेऊन सर्वात प्रथम एप्रिल २०१५ ला डोंबिवली येथील प्राचीन मंदिर आहे तेथून दर्शन घेऊन पहाटे ५.३० सर्वांचा निरोप घेत गोव्याच्या प्रवासाला एकटीनेच सायकलवरून सुरवात केली.

प्रवासाला निघण्यापूर्वी रूट मॅप तसेच कोणकोणती गावे लागतात त्यातील कोणत्या गावात राहण्याची, खाण्याची सोया होऊ शकते याची माहिती घेतली होती. त्यामुळे प्रवास करतांना फारशा अडचणी आल्या नाहीत. दिवसाला १०० ते १३० तीस किलोमीटर अंतर पार करत पाच दिवसात सुखरूप गोवा गाठले. त्यानंतर डोंबिवली ते कोल्हापूर असे सायकलिंग केले आणि त्यानंतर ३१ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत डोंबिवली ते हिमालय असा तब्बल १७,९०० किलो मीटरचे अंतर पार करत सायकलवरून धाडसी प्रवास केला. मात्र यावेळेस माझ्या बरोबर५४ वर्षांचे रमाकांत महाडिक (अप्पा )हे सायकल पटू होते. या अशा बर्फाळ प्रदेशात सायकलिंग करतांना त्यांची मोठी मदत झाली. काही ठिकाणी तर सायकल उचलून घेऊन अवघड रस्ते पार करावे लागले.

आता या पुढे सह्याद्री पर्वतातील सर्व गड किल्ल्यांना सायकलवरून भेट देणार असल्याचा मनोदय व्यक्त केला .याच प्रमाणे मीरा वैद्य ,शशांक वैद्य यांनीहि मध्य प्रदेश अन्य लांबचे खडतर प्रवास केल्याचे सांगितले. तसेच रुपेश, अनंत, तुषार, अमित घुमरे या सायकलस्वारांनीही आपले थरारक प्रवास वर्णन उपस्थितांसमोर कथन केले.

Web Title:  'Cycle katta' painted in Karjat; Travel from Dombivli to Goa Mamata Pardesi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.