शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Cyclone Nisarga: केंद्रीय पथकाने घेतला नुकसानीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:42 AM

रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट; कोकणचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करणार

- निखिल म्हात्रे अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी सकाळीच दाखल झाले होते. अलिबाग तालुक्यातील आक्षी, नागाव, सताड बंदर, चौल या ठिकाणी त्यांनी नुकसानग्रस्तांसोबत चर्चा करीत पाहणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीरही दिला. जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकात सहा अधिकारी असून कोकणचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल केंद्राला सादर करणार आहेत.संयुक्त सचिव रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर.बी. कौल, ऊर्जा मंत्रालय संचालक एन.आर.एल.के. प्रसाद, ग्रामविकास मंत्रालयाचे उपसचिव एस.एस. मोदी, कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग, वाहतूक मंत्रालय प्रमुख अभियंता अंशुमली श्रीवास्तव यांचा या पथकात समावेश होता. मुंबईतील भाऊचा धक्का येथून रो-रो बोटीने मंगळवारी सकाळी केंद्रीय पथक रायगडमध्ये दाखल झाले. या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर हे केंद्रीय पथक नागावकडे रवाना झाले.३ जूनला निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळील मुरूड समुद्रकिनारी धडकले होते. या वादळामुळे रायगड जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये नारळी-पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. तर अनेकांच्या घरावरची कौले, पत्रे उडाले आहेत. मातीच्या घरांची पडझड झाली. झाडांसह विद्युत खांबांची पडझड झाल्याने या भागातील विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाची पाहणी केली. त्या वेळी रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी रु पयांच्या तातडीची मदत दिली. मात्र, केंद्र सरकारनेदेखील कोकणातील नुकसानग्रस्त भागाला मदत द्यावी, असे म्हटले होते. तसेच खासदार सुनील तटकरे यांनीदेखील केंद्र सरकारकडे मदत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता केंद्रीय पथक रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहे. केंद्रीय पथकात असलेले सहा अधिकारी कोकणचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल केंद्राला सादर करणार आहेत.गाड्यांच्या ताफ्याचे ग्रामस्थांना कु तूहलमंगळवारी सकाळीच केंद्रीय पथकाबरोबर गाड्यांचा ताफा अलिबाग-मुरूड रस्त्यावर धावत असल्याने नागाव ते चौल पट्ट्यातले लोक कुतूहलाने या ताफ्याकडे पाहत होते.कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून वाहतूक बंद होती.त्यानंतर मंगळवारी प्रथम गाड्यांचा ताफा रस्त्यावर पाहावयास मिळाला.तसेच आलेल्या पथकाकडून आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.काम सुरू असल्याने ताटकळत राहावे लागलेकेंद्रीय पथक जेव्हा नागावमधील नुकसानीची पाहणी करून चौलकडे जात होते, त्या वेळी विजेचे खांब उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.ग्रामस्थांच्या मदतीने महावितरणचे कर्मचारी हे काम करत असताना रस्ता पूर्णत: बंद झाला होता. त्यामुळे केंद्रीय पथकाला काही कालावधीसाठी ताटकळत राहावे लागले.ग्रामस्थ प्रशासनाला करत असलेली मदत केंद्रीय पथकाने पाहिली, मात्र याची नोंद त्यांनी घेतली आहे का, हे मात्र कळले नाही.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ