Cyclone Nisarga : काळजी करू नका, नुकसान भरपाईचे मी पाहतो, शरद पवार यांचे कोकणवासियांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 03:50 PM2020-06-09T15:50:35+5:302020-06-09T15:53:51+5:30

शरद पवार हे माणगांव शहरात आल्यानंतर माणगांवकरातर्फे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झालेल्या नागरिकांच्या व गावकारांच्या समस्या मांडल्या.

Cyclone Nisarga: Don't worry, Sharad Pawar's assurance to the people of Konkan | Cyclone Nisarga : काळजी करू नका, नुकसान भरपाईचे मी पाहतो, शरद पवार यांचे कोकणवासियांना आश्वासन

Cyclone Nisarga : काळजी करू नका, नुकसान भरपाईचे मी पाहतो, शरद पवार यांचे कोकणवासियांना आश्वासन

Next

- गिरीश गोरेगावकर 
माणगाव (रायगड) -  माणगांव तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे माणगांव येथे मंगळवार दि. ९ जून रोजी ११.३० वा. महाड अर्बन बँके समोर हजर झाले. त्यावेळी आपत्तग्रस्त नागरिकांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी माणगांवकरांच्या व्यथा मांडल्या. यावेळी खा. सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आ. भरत गोगावले, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, माणगांव तालुका रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. 
    
शरद पवार हे माणगांव शहरात आल्यानंतर माणगांवकरातर्फे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झालेल्या नागरिकांच्या व गावकारांच्या समस्या मांडल्या. माणगांव शहरात गेले ८ दिवस वीज व पाणी नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेचे खांब तुटल्याने वीज पुरवठा गेले ८ दिवस बंद आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद होता. मात्र जनरेटर लावून तो तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेला आहे.

अनेकांच्या घराचे पत्रे, कौले उडून अतोनात नुकसान झाले आहे. या वादळात छपर उडाल्याने लोकांच्या घरातील अन्नधान्याची नासाडी झाली आहे. या वादळातील आपतग्रस्तना तातडीने मदत मिळावी व माणगाव तालुक्यातील वीज पुरवठा त्वरित सुरू करावा अशा प्रकारच्या अनेक समस्या व मागण्या माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी मांडल्या. यानंतर शरद पवार यांनी गाडी जवळच  उभे राहूनच या सर्व समस्या व मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण होतील. काळजी नको मी सर्व पाहतो  असे माणगाव करानां आश्वासन दिले.

Web Title: Cyclone Nisarga: Don't worry, Sharad Pawar's assurance to the people of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.