मधुकर ठाकूर।लोकमत न्यूज नेटवर्कउरण : निसर्ग चक्रीवादळाने उरणमध्ये चांगलाच तडाखा दिला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या उरण तालुक्यातील अनेक गावांमधील रहिवाशांच्या घरांचे पत्रे हवेतच उडून गेले तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळून पडली आहेत. मंगळवारपासूनच दहशतीचे सावट घेऊन आलेले निसर्ग चक्रीवादळ हे बुधवारी रायगड जिल्ह्यातील अलिबागला धडकले.ताशी सागरी ४० ते ५० नॉटिकल मैलाने रायगडात दाखल झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील अनेक भागांबरोबरच उरणलाही चांगलाच तडाखा दिला.घारापुरी, मोरा, पीरवाडी, करंजा, नागाव, बांधपाडा, आवरे, कडापे आणि अन्य गावांतील अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत. तर अनेक घरांवर झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवरच झाडे कोसळून रहदारी ठप्प झाली होती.उरणमध्ये शेकडो घरांचे पत्रे, कौले उडाली आहेत. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.घरांचे पत्रे उडाल्याने आणि पडझड झाल्याने अनेक कुटुंबांतील लोकांना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात भिजतच रात्र काढावी लागणार आहे.
उरणमधील अनेक गावांमधील वीजपुरवठा सकाळपासूनच खंडित झाला होता. संध्याकाळपर्यंत तरी खंडित वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आलेला नव्हता. दरम्यान, खबरदारी म्हणून उरण किनारपट्टीवरील गावांतील १८०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.यापैकी ५०० नागरिकांना शाळेत तर उर्वरितांना त्यांच्या नातेवाइकांकडे ठेवण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.महाडमध्ये महामार्ग झाला ठप्प, गावांत भीतीचे वातावरणसिकंदर अनवारे।लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : बुधवारी सकाळपासूनच संपूर्ण महाडमध्ये सोसाट्याच्या वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली; त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. महाड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.महाड तालुक्यात दुपारी बारानंतर वाºयाचा वेग वाढला. त्यामुळे संपूर्ण महाडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी तालुक्यातील जवळपास संपूर्ण गावांमध्ये अनेक घरांची छपरे उडाली. अनेक घरांवर झाडे कोसळल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. या चक्रीवादळाने तालुक्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त केले आहेत. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना दोन दिवस अंधारात राहावे लागणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरदेखील अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने महामार्गही काही काळ ठप्प झाला होता.जोरदार वारा, आवाजाचा लोकांनी घेतला धसकासंजय करडे।लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड जंजिरा : बुधवार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली व सकाळी ११ पासून जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. हळूहळू वाºयाचा वेग व पावसाचा वेगही वाढल्याने समस्त जनता भयग्रस्त झाली. प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून समुद्रकिनारी असणाºया लोकांना मराठी शाळा क्रमांक १ अंजुमन हायस्कूल शिंपी समाज मंदिर माळी समाज हॉल व कालभैरव मंदिर आदी ठिकाणी ठेवण्यात आले. वाºयाचा वेग एवढा जबरदस्त होता की सिमेंट काँक्रिटचे पत्रे, लोखंडी पत्रे रस्त्यावर येऊन पडले. समुद्रकिनारी वाºयाचा वेग जास्त असल्याने लाटा किनाºयाला मोठ्या स्वरूपात धडकत होत्या. नारळाची उंच उंच झाडे प्रचंड वाºयामुळे जोराने हलत होती. वारा जास्त असल्याने समुद्रकिनारी जाणे मोठे कठीण झाले होते. वाºयाच्या वेगामुळे घरावरील पत्रे फटाक्याच्या आवाजाप्रमाणे गर्जत होते. त्यामुळे एकंदर भीतीदायक वातावरण होते.