कामगार कायद्यांच्या अभ्यासाची दखल घेऊन उरण येथील उदय म्हात्रे यांना डी-लिट जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 04:38 PM2023-03-23T16:38:59+5:302023-03-23T16:38:59+5:30
मधुकर ठाकूर उरण : कंत्राटी कामगार कायद्यांच्या मागील २५ वर्षांपासून केलेला अभ्यासाची दखल घेऊन केगाव -उरण येथील उदय केसरीनाथ ...
मधुकर ठाकूर
उरण : कंत्राटी कामगार कायद्यांच्या मागील २५ वर्षांपासून केलेला अभ्यासाची दखल घेऊन केगाव -उरण येथील उदय केसरीनाथ म्हात्रे यांना एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने डि-लिट पदवी जाहीर केली आहे.याआधीही त्यांना महाराष्ट्र रत्न या किताबाने गौरविण्यात आले आहे.
उदय म्हात्रे हे केगाव -उरण येथील रहिवासी आहेत. त्यांनी कामगार कायद्याचा अभ्यास केला आहे.या २५ वर्षांच्या काळात त्यांनी संशोधनही केले आहे.उदय म्हात्रे यांच्या या उल्लेखनीय कामगिरी दखल घेऊन एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने डि-लिट पदवी जाहीर केली आहे.
१६ एप्रिल रोजी डि-लिट पदवी जाहीर कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. याआधीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन ( महासेवा ) आणि रेड ॲन्ट यांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र रत्न या किताबाने गौरविण्यात आले आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हात्रे यांच्या कार्याची दखल घेऊन पत्राद्वारे कौतुक केले आहे. शुभेच्छाही दिल्या आहेत.