"तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो"; दादा भुसेंचं ठाकरेंना आव्हान

By राजेश भोस्तेकर | Published: September 22, 2022 06:26 PM2022-09-22T18:26:02+5:302022-09-22T18:26:49+5:30

शिवसेना पक्ष प्रमुख हे आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारावर गद्दार, तसेच बाप पळविल्याची टीका करीत आहेत. याबाबत दादा भुसे यांनी समाचार घेऊन त्याच्या बोलण्याला उत्तर दिले आहे.

Dada Bhuse challenge to Uddhav Thackeray Over his statement | "तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो"; दादा भुसेंचं ठाकरेंना आव्हान

"तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो"; दादा भुसेंचं ठाकरेंना आव्हान

Next

अलिबाग - बाळासाहेब ठाकरे हे एका व्यक्तीचे बाप नाहीत ते समस्त शिवसैनिकांचे बाप आहेत. बाळासाहेब हे राष्ट्र पुरुष असल्याचे जाहीर केले आहे. शिवसैनिकांच्या बापाला कमी लेखू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरे याचा फोटो काढतो आपण छत्रपती शिवाजी महाराज याचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जा. असे आव्हान राज्याचे बंदरे, मत्स्य विकास मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. मुख्यमंत्री असताना शिवसैनिक यांना भेटले नाहीत आणि आता प्रत्येकाला भेटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडीच महिन्यापासून काम करीत आहेत. तसे काम अद्याप एकाही मुख्यमंत्र्यांनी आधी केलेले नाही असेही भुसे यांनी म्हटले आहे. 

शिंदे गटाची रायगड जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती. ५ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजन साठी ही बैठक आयोजित केली होती. राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिंदे गट प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा प्रमुख राजा केणी, उपनेत्या शुंभागी म्हात्रे यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिवसेना पक्ष प्रमुख हे आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारावर गद्दार, तसेच बाप पळविल्याची टीका करीत आहेत. याबाबत दादा भुसे यांनी समाचार घेऊन त्याच्या बोलण्याला उत्तर दिले आहे. शिंदे आणि भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी विविध हितकारी निर्णय घेतले आहेत. ते जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन ही केले आहे.

आमदारांनी उठाव केला तेव्हा आम्ही घरातील भांडण मितावे यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची मानसिकता आमदार यांच्या बाजूने बदलत होती. मात्र संजय राऊत, भास्कर जाधव यायचे आणि ठाकरे याचे विचार बदलत होते. अडीच वर्ष घरात बसून काहीही काम केले नाही. बाळासाहेब याना प्रेरित असलेले जनतेचे निर्णय घेण्याबाबत त्यावेळी आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. मात्र अजित पवार हे खोडा टाकण्याचे काम करीत असल्याने आमची अडचण होत होती. अशी टीकाही भुसे यांनी भाषणातून केली आहे.
 

Web Title: Dada Bhuse challenge to Uddhav Thackeray Over his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.