दाेन चिमुकल्यांना पाेलादपूर पाेलिसांनी दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 01:13 AM2021-01-16T01:13:09+5:302021-01-16T01:13:25+5:30
घरच्यांची आठवण आल्याने मुंबईला निघाले चालत
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : महाबळेश्वर येथील एका अनाथाश्रमातील दाेन लहान मुले पायी प्रवास करत निघाले हाेते. पाेलादपूरमार्गावरील वाहनांना हात करून थांबण्याची विनंती करत हाेते. याची माहिती पाेलादपूर पाेलिसांना मिळताच त्यांनी पाेलादपूर रस्त्यावरील मुलांंचा शाेध घेऊन त्या चिमुकल्यांना पाेलीस ठाण्यात आणले, तेव्हा धक्कादायक बाब समाेर आली. दाेन चिमुकल्यांना घरच्यांची आठवण आल्याने त्यांनी घरचा रस्ता धरला हाेता.
११ जानेवारी रोजी पोलादपूर पोलीस ठाण्यातील बीटमार्शल गणेश किर्वे आणि हाेमगार्ड विकी कापडेकर हे पेट्राेलिंग करत हाेते. पोलादपूर बसस्थानकाजवळील रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना माहिती दिली की, मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने दाेन लहान मुले चालत जात आहेत. तसेच ते वाहनांना हात करत थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मिळताच किर्वे आणि कापडेकर हे या मुलांचा शोध घेण्याकरिता निघाले. तेव्हा त्यांना ग्रामीण रुग्णालय पोलादपूरजवळ दोन लहान मुले दिसली. किर्वे आणि कापडेकर यांनी मुलांच्या जवळ जाऊन विचारपूस केली. आम्ही मुंबईला जात आहाेत, असे त्या दाेन चिमुकल्यांनी सांगितले. साेबत काेणी माेठी व्यक्ती नाही याचा दाेन्ही पाेलिसांना संशय आला. दाेन्ही मुलांंबराेबर गाेड बाेलून त्यांना पाेलीस ठाण्यात आणले. त्यातील एकाचे नाव आफ्रिदी बद्रूझम शेख (९) आणि दुसऱ्या मुलाने अब्दुल मेहमूद मेहताब शेख (८) असे सांगितले. मात्र, या व्यतिरिक्त ते काेणतीही माहिती देत नव्हते. त्यानंतर, पाेलिसांना पाेलादपूर येथील सत्तार इस्माईल निगुडकर यांना बाेलवून घेतले. त्यांच्यामार्फत मुलांकडे विचारपूस केली असता त्यांना घरच्यांची आठवण येत असल्याने ते अंजुमन उर्दू यतीमखाना महाबळेश्वर येथून गुपचूप घरी जात होते; परंतु तिकिटाला पैसे नसल्याने ते पायी मुंबईला चालत जात असल्याचे सांगितले. त्यानंतर या मुलांकडे त्यांच्या आईवडिलांचा पत्ता विचारला असता त्यातील आफ्रिदी शेख याने त्याचे वडील बद्रूझम शेख यांचा मोबाइल नंबर दिला. तर अब्दुलने मोबाइल नंबर आणि मुंबई सेंट्रल येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पाेलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे, अंमलदार विजय चव्हाण यांनी या मुलांच्या पालकांशी संवाद साधला. त्यानंतर, पालकांच्या म्हणण्याप्रमाणे मुलांना जेवण देऊन अंजुमन उर्दू यतीमखाना महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथे नेले. तेथील प्राचार्या शबाना शेख आणि त्यांचे पती असद इम्रान इक्बाल शेख यांच्या ताब्यात दिले.
का पळाली मुलं?
दाेन्ही मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी मुलांना अनाथाश्रमात ठेवले आहे. मुले अनाथाश्रमातून का पळाली, हा विषय महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी त्यांना त्रास हाेत आहे का, याची माहिती आम्ही घेत आहाेत, असे पाेलादपूरचे सहायक पाेलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.