शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

वडखळमध्ये लाखमोलाच्या दहीहंडीचे आकर्षण; विद्यार्थ्यांनी फोडली ज्ञानाची दहीहंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:20 AM

वडखळसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही दहीहंडी बांधण्यात येणार असल्याने ही दहीहंडी फोडण्याचे थेट निमंत्रण युगंधर सामाजिक संस्थेने गोविंदा पथकांना केले आहे.

पेण : वडखळ येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युगंधर सामाजिक संस्था वडखळ व जेएसडब्लू स्टील कंपनी यांच्या विद्यमाने वडखळ नाक्यावर गोविंदा मंडळांसाठी १ लाख ११ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली दहीहंडी पेणमध्ये आकर्षण ठरणार आहे.

वडखळसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही दहीहंडी बांधण्यात येणार असल्याने ही दहीहंडी फोडण्याचे थेट निमंत्रण युगंधर सामाजिक संस्थेने गोविंदा पथकांना केले आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेश मोकल यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. कार्यक्रमांसाठी जेएसडब्लू प्रेसिडंट जी. एस. राठोड, जनरल मॅनेजर नारायण बोलबंडा, जनरल मॅनेजर आत्माराम बेतकेकर, जनरल मॅनेजर बळवंत जोग व जनरल मॅनेजर विनायक दळवी अशा विविध विभागांचे कंपनीतील मान्यवर या दहीहंडीच्या उत्सवप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू आहे.बोर्ली-पंचतनमध्ये ११५० दहीहंडी फुटणारबोर्लीपंचतन, वडवली, वेळास, दिवेआगर गावांत विशिष्ट आडनावावरून असलेली खोती वा कंपनी ही गुण्या गोविंदाने दहीहंडीचा उत्सव करतात. परंपरेनुसार गावात प्रत्येक खोतीची वेगळी फळी असते. यात खोतीतील ज्येष्ठ व्यक्ती मिरवणुकीत सर्वात पुढे असते. येथे दोरीवर लटकलेल्या दहीहंडीपेक्षा नारळ-पोफळीवर टोकाला लावलेल्या दहीहंडी फोडायला तरुणांची झुंबड पाहायला मिळते.

तालुक्यात श्रीवर्धन व दिघी दोन पोलीसठाणी आहेत. दिघी सागरी पोलीसठाण्या अंतर्गत ३५ सार्वजनिक दहीहंडी व १११५ खासगी दहीहंडी आहेत. तालुक्यात एकूण ११५० दहीहंडी शनिवारी फुटणार आहेत. सणाच्या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत, तर नागरिकांनी शांततेत सण साजरे करावेत, असे आवाहन दिघी पोलीस ठाण्याचे अधिकारी एम. आर. शेलार यांनी केले. हरिकीर्तन, भजन, नृत्य असे अनेक कार्यक्रम बोर्ली-पंचतन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव ठिकाणी दोन दिवस होताना दिसतात.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी