कोरोनानंतर जिल्ह्यात दहीहंडीला उत्साह, आज फुटणार 8 हजार 193 दहिहंड्या

By निखिल म्हात्रे | Published: September 6, 2023 03:33 PM2023-09-06T15:33:54+5:302023-09-06T15:34:32+5:30

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोपाळ काळाच्या दिवशी रायगड जिल्हयात यंदा 8 हजार 193 दहिहंडया उभारण्यात ...

Dahihandi is excited in the district after Corona, 8 thousand 193 dahihandi will be broken today | कोरोनानंतर जिल्ह्यात दहीहंडीला उत्साह, आज फुटणार 8 हजार 193 दहिहंड्या

कोरोनानंतर जिल्ह्यात दहीहंडीला उत्साह, आज फुटणार 8 हजार 193 दहिहंड्या

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग - श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोपाळ काळाच्या दिवशी रायगड जिल्हयात यंदा 8 हजार 193 दहिहंडया उभारण्यात येणार असून त्यात 1 हजार 863  सार्वजनिक तर 6 हजार 330 खासगी दहिहंडीचा समावेश आहे. मागील 2 वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गोपाळकाळा गेल्याने यावर्षी दहीहंडी गोंविद्यांमध्ये उत्साह ओसांडून वाहत आहे. त्यामुळे सध्या दही हंडीसह इतर वस्तु खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होती.

अलिबाग, पेण, रोहा यासह कर्जत, मुरुड शहरातही दहिहंडी फोडण्यासाठी मोठ्या रक्कमांचे बक्षिस लावण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जिल्हयात विविध कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले असून 176 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. दहिंहडीचा उत्सव साजरा होत असताना जिल्हयात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून त्यासाठी शिघ्र कृती दलाची कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे.
गोपाळकालानिमित्त रायगड जिल्ह्यात गुरुवारी एकूण 8 हजार 193 ठिकाणी दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत.

त्यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक 165, खाजगी 290, नेरळ- सार्वजनिक 68, खाजगी 158, माथेरान- सार्वजनिक 05, खाजगी 02, खालापूर- सार्वजनिक 04, खाजगी 26, खोपोली- सार्वजनिक 60, खाजगी 55, रसायनी- सार्वजनिक 105, खाजगी 140, पेण- सार्वजनिक 115, खाजगी - 275, दादर सागरी- सार्वजनिक 70, खाजगी 95, पोयनाड- सार्वजनिक 97, खाजगी 46, वडखळ- सार्वजनिक 115, खाजगी 150, अलिबाग- सार्वजनिक 140, खाजगी 360, रेवदंडा- सार्वजनिक 134, खाजगी 264, मुरुड- सार्वजनिक 87, खाजगी 193, मांडवा सागरी- सार्वजनिक 79 खाजगी 157, रोहा- सार्वजनिक 72, खाजगी 157, कोलाड- सार्वजनिक 25, खाजगी 55, नागोठणे- सार्वजनिक 52, खाजगी 235, पाली- सार्वजनिक 116, खाजगी 48, माणगाव- सार्वजनिक 15, खाजगी 312, गोरेगाव- सार्वजनिक 24, खाजगी 92, तळा- सार्वजनिक 68 खाजगी 260, श्रीवर्धन- सार्वजनिक 02, खाजगी 873, म्हसळा- सार्वजनिक 89, खाजगी 530, दिघी- सार्वजनिक 40, खाजगी 1122, महाड शहर- सार्वजनिक 65, खाजगी 79, महाड तालुका- सार्वजनिक 12, खाजगी 90, महाड एमआयडीसी- सार्वजनिक 46 खाजगी 70, पोलादपूर- सार्वजनिक 88, खाजगी 105 अशा एकूण सार्वजनिक 1 हजार 863 तर खाजगी 6 हजार 193 दहीहंड्या फुटणार आहेत. गोकुळाष्टमी निमित्त रायगड पोलीस क्षेत्रात 176 मिरवणुका निघणार आहेत.

दही हंडी निमित्त जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी एसआरपीएफ एक प्लाटून, आर.सी.पी प्लाटून दोन,स्ट्रायकिंग फोर्स पाच, 1 अ.पो. अधीक्षक, 8 उप विभा.पो. अधिकारी, 123 पो. अधिकारी, 1300 पो.अंमलदार, होमगार्ड 350 आदीचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- सोमनाथ घार्गे, जिल्हापोलिस अधिक्षक.

Web Title: Dahihandi is excited in the district after Corona, 8 thousand 193 dahihandi will be broken today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.