डहाणूत कम्युनिस्टांचा मोर्चा
By admin | Published: August 14, 2015 11:34 PM2015-08-14T23:34:15+5:302015-08-14T23:34:15+5:30
केंद्रातील भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी अच्छे दिनचा मागमूस दिसत नाही. उलटपक्षी महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने गोरगरीब आदिवासी तसेच सर्वसामान्यांना जीवन
डहाणू : केंद्रातील भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी अच्छे दिनचा मागमूस दिसत नाही. उलटपक्षी महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने गोरगरीब आदिवासी तसेच सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली डहाणूच्या उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढून निषेध केला.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास डहाणूच्या तारपा चौक येथून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेंट्रल कमिटीचे सचिव मंडळ सदस्य कॉ. अशोक ढवळे, कॉ. मरियम ढवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढला होता. या वेळी उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.