दिवेआगर विकास पॅनेलचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:42 AM2017-07-31T00:42:27+5:302017-07-31T00:42:27+5:30

रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेले श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाच्या श्री गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट ए ६०४ रायगडसाठी २०१७ ते २०२२ च्या नवीन विश्वस्त मंडळ निवडीसाठी मतदान घेण्यात आले.

daivaeagara-vaikaasa-paennaelacaa-vaijaya | दिवेआगर विकास पॅनेलचा विजय

दिवेआगर विकास पॅनेलचा विजय

Next

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेले श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाच्या श्री गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट ए ६०४ रायगडसाठी २०१७ ते २०२२ च्या नवीन विश्वस्त मंडळ निवडीसाठी मतदान घेण्यात आले. सुवर्ण गणेश दिवेआगर पॅनेल व विजय सुदाम तोडणकर यांचे पॅनेल यांच्यामध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी एकूण १६११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुवर्ण गणेश दिवेआगर विकास पॅनेल यांनी दणदणीत विजय संपादन केला. हा निकाल शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी रूपेश गायकवाड यांनी जाहीर केला.
सध्या मंदिराचा कारभार पाहात असलेल्या समितीने रात्रीच निकालानंतर नवीन नियुक्त विश्वस्त मंडळाकडे सुवर्ण गणेश मंदिराचा कारभार हस्तांतरित केला. सुवर्ण गणेश दिवेआगरच्या २०१२ पासूनचा विश्वस्त मंडळाचा वाद चांगलाच गाजला होता. गावकीने नेमून दिलेले विश्वस्त मंडळ व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या विश्वस्त मंडळामधील वाद मिटता मिटत नव्हता. २०१७ पर्यंत मुदत असलेल्या मागील विश्वस्त मंडळाची मुदत संपत आल्यावर धर्मादाय आयुक्तांनी दोन्ही गटांच्या संमतीने २०१७ ते २०२२ पर्यंतच्या विश्वस्त मंडळ निवडीसाठी २८ जुलै २०१७ रोजी गुप्त पद्धतीने मतदान राबविण्याचे निश्चित केले. त्यानुसार शुक्रवारी सुवर्ण गणेश दिवेआगर विकास पॅनेल व विजय सुदाम तोडणकर यांच्या अधिपत्याखालील पॅनेल अशा दोन पॅनेलमध्ये निवडणूक घेण्यात आली. यासाठी दिवेआगरमधील १६११ हिंदू मतदारांनी विश्वस्त मंडळ निवडणुकीसाठी हक्क बजावला. या निवडणुकीचा निकाल रात्री ९.३० नंतर जाहीर करण्यात आला. सुवर्ण गणेश दिवेआगर विकास पॅनेल यांना ९९६ तर विरोधी विजय सुदाम तोडणकर यांच्या पॅनेलला ४२६ मते मिळाली तर १८९ मते अवैध ठरली. सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी रूपेश गायकवाड यांच्या टीमने निवडणूक प्रक्रि या राबविली तर दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके व कर्मचाºयांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तर नव्याने नियुक्त झालेल्या विश्वस्त मंडळाकडे याआधीच्या समितीने संपूर्ण कार्यभार सुपूर्द केल्याचे सचिव संजीव खोपकर यांनी सांगितले.

Web Title: daivaeagara-vaikaasa-paennaelacaa-vaijaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.