शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

दिवेआगर विकास पॅनेलचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:42 AM

रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेले श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाच्या श्री गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट ए ६०४ रायगडसाठी २०१७ ते २०२२ च्या नवीन विश्वस्त मंडळ निवडीसाठी मतदान घेण्यात आले.

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेले श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाच्या श्री गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट ए ६०४ रायगडसाठी २०१७ ते २०२२ च्या नवीन विश्वस्त मंडळ निवडीसाठी मतदान घेण्यात आले. सुवर्ण गणेश दिवेआगर पॅनेल व विजय सुदाम तोडणकर यांचे पॅनेल यांच्यामध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी एकूण १६११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुवर्ण गणेश दिवेआगर विकास पॅनेल यांनी दणदणीत विजय संपादन केला. हा निकाल शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी रूपेश गायकवाड यांनी जाहीर केला.सध्या मंदिराचा कारभार पाहात असलेल्या समितीने रात्रीच निकालानंतर नवीन नियुक्त विश्वस्त मंडळाकडे सुवर्ण गणेश मंदिराचा कारभार हस्तांतरित केला. सुवर्ण गणेश दिवेआगरच्या २०१२ पासूनचा विश्वस्त मंडळाचा वाद चांगलाच गाजला होता. गावकीने नेमून दिलेले विश्वस्त मंडळ व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या विश्वस्त मंडळामधील वाद मिटता मिटत नव्हता. २०१७ पर्यंत मुदत असलेल्या मागील विश्वस्त मंडळाची मुदत संपत आल्यावर धर्मादाय आयुक्तांनी दोन्ही गटांच्या संमतीने २०१७ ते २०२२ पर्यंतच्या विश्वस्त मंडळ निवडीसाठी २८ जुलै २०१७ रोजी गुप्त पद्धतीने मतदान राबविण्याचे निश्चित केले. त्यानुसार शुक्रवारी सुवर्ण गणेश दिवेआगर विकास पॅनेल व विजय सुदाम तोडणकर यांच्या अधिपत्याखालील पॅनेल अशा दोन पॅनेलमध्ये निवडणूक घेण्यात आली. यासाठी दिवेआगरमधील १६११ हिंदू मतदारांनी विश्वस्त मंडळ निवडणुकीसाठी हक्क बजावला. या निवडणुकीचा निकाल रात्री ९.३० नंतर जाहीर करण्यात आला. सुवर्ण गणेश दिवेआगर विकास पॅनेल यांना ९९६ तर विरोधी विजय सुदाम तोडणकर यांच्या पॅनेलला ४२६ मते मिळाली तर १८९ मते अवैध ठरली. सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी रूपेश गायकवाड यांच्या टीमने निवडणूक प्रक्रि या राबविली तर दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके व कर्मचाºयांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तर नव्याने नियुक्त झालेल्या विश्वस्त मंडळाकडे याआधीच्या समितीने संपूर्ण कार्यभार सुपूर्द केल्याचे सचिव संजीव खोपकर यांनी सांगितले.