नेरळचे अवसरे धरण ओव्हरफ्लो, सांडव्यातून पाणी बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:59 AM2019-07-30T00:59:47+5:302019-07-30T01:00:19+5:30

सांडव्यातून पाणी बाहेर : समाधानकारक पाऊस झाल्याने धरण भरले

Dam overflow of Nerala basin | नेरळचे अवसरे धरण ओव्हरफ्लो, सांडव्यातून पाणी बाहेर

नेरळचे अवसरे धरण ओव्हरफ्लो, सांडव्यातून पाणी बाहेर

Next

नेरळ : कर्जत तालुक्यातील अवसरे येथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेला लघु-पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण भरून त्यातील अतिरिक्त पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर पडू लागले आहे.

पाटबंधारे विभागाने अवसरे, बिरदोले आणि वरई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून अवसरे हे लघु-पाटबंधारे प्रकल्पाचे धरण साकारले. त्या भागातील सात गावातील ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या अवसरे लघु-पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी धरणाची अनेक वर्षे दुरुस्ती केली गेली नसल्याने शेतीला कमी पडते, त्यामुळे अवसरे भागातील शेतकरी वगळता कोदिवले, बिरडोळे, वरई, मानवली, निकोप आणि मोहाली भागातील शेतकरी भातशेती उन्हाळ्यात करीत नाहीत. दरवर्षी शेतकरी धरणाची दुरुस्ती करण्याची मागणी करीत असतात. मात्र, पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांच्या मागणीकडे बघायला वेळ नाही. गेल्या चार-पाच वर्षांत किरकोळ प्रमाणात शेतकरी उन्हाळात भातशेती करीत आहेत. तर शेतकºयांच्या ३० हेक्टर जमिनीवर अवसरे धरण बांधण्यात आले असून या धरणाच्या जलाशयात पाण्याखाली गेलेल्या जमिनीचे केवळ भू भाडे असून काही शेतकºयाच्या जमिनी या सांडवा, मातीचा बांध आणि कालवे यांच्यासाठी वापरल्या आहेत. त्या जमिनी आता शेतकरी आपल्याला वापरायला मिळाव्यात म्हणून मागणी करीत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागावर या भागातील शेतकरी नाराज आहेत. मात्र, धरण पाण्याने तुडुंब भरल्याने शेतकरी खूश झाला आहे. धरणाच्या जलाशयात पाणीसाठा हा ६४ दशलक्ष घनमीटर होत असून, मृत साठा वगळता ते सर्व पाणी हे शेतीसाठी देण्याचे नियोजन असते. मात्र, या भागात एका खासगी पाइपलाइनचे काम करण्यासाठी शेतीसाठी पाणी देणे बंद झाले. ते आजतागत दिले गेले नाही, त्यामुळे शेतकºयांना उन्हाळ्यात शेती करता येत नाही. या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती केली जायची, त्यामुळे शेतकºयांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सहज शक्य व्हायचे; परंतु पाणी सोडले जात नसल्याने शेती करणे बंद झाले असून शेतकºयांच्या रोजगाराचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यात शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी अवसरे, वरई, बिरदोले, कोदिवले, निकोप, मोहिली येथील शेतकरी करू लागले आहेत.

शेतकºयांची मागणी असेल तर आम्ही शेतीसाठी पाणी सोडू शकतो. मात्र, धरणातून आम्ही दर वेळी कमी प्रमाणात पाणी सोडत असतोच; पण भात शेती केली जाणार असेल तर मात्र शेतीच्या आवश्यकतेनुसार पाणी सोडले जाईल.
-भरत काटले,
शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

Web Title: Dam overflow of Nerala basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.