शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नेरळचे अवसरे धरण ओव्हरफ्लो, सांडव्यातून पाणी बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:59 AM

सांडव्यातून पाणी बाहेर : समाधानकारक पाऊस झाल्याने धरण भरले

नेरळ : कर्जत तालुक्यातील अवसरे येथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेला लघु-पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण भरून त्यातील अतिरिक्त पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर पडू लागले आहे.

पाटबंधारे विभागाने अवसरे, बिरदोले आणि वरई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून अवसरे हे लघु-पाटबंधारे प्रकल्पाचे धरण साकारले. त्या भागातील सात गावातील ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या अवसरे लघु-पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी धरणाची अनेक वर्षे दुरुस्ती केली गेली नसल्याने शेतीला कमी पडते, त्यामुळे अवसरे भागातील शेतकरी वगळता कोदिवले, बिरडोळे, वरई, मानवली, निकोप आणि मोहाली भागातील शेतकरी भातशेती उन्हाळ्यात करीत नाहीत. दरवर्षी शेतकरी धरणाची दुरुस्ती करण्याची मागणी करीत असतात. मात्र, पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांच्या मागणीकडे बघायला वेळ नाही. गेल्या चार-पाच वर्षांत किरकोळ प्रमाणात शेतकरी उन्हाळात भातशेती करीत आहेत. तर शेतकºयांच्या ३० हेक्टर जमिनीवर अवसरे धरण बांधण्यात आले असून या धरणाच्या जलाशयात पाण्याखाली गेलेल्या जमिनीचे केवळ भू भाडे असून काही शेतकºयाच्या जमिनी या सांडवा, मातीचा बांध आणि कालवे यांच्यासाठी वापरल्या आहेत. त्या जमिनी आता शेतकरी आपल्याला वापरायला मिळाव्यात म्हणून मागणी करीत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागावर या भागातील शेतकरी नाराज आहेत. मात्र, धरण पाण्याने तुडुंब भरल्याने शेतकरी खूश झाला आहे. धरणाच्या जलाशयात पाणीसाठा हा ६४ दशलक्ष घनमीटर होत असून, मृत साठा वगळता ते सर्व पाणी हे शेतीसाठी देण्याचे नियोजन असते. मात्र, या भागात एका खासगी पाइपलाइनचे काम करण्यासाठी शेतीसाठी पाणी देणे बंद झाले. ते आजतागत दिले गेले नाही, त्यामुळे शेतकºयांना उन्हाळ्यात शेती करता येत नाही. या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती केली जायची, त्यामुळे शेतकºयांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सहज शक्य व्हायचे; परंतु पाणी सोडले जात नसल्याने शेती करणे बंद झाले असून शेतकºयांच्या रोजगाराचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यात शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी अवसरे, वरई, बिरदोले, कोदिवले, निकोप, मोहिली येथील शेतकरी करू लागले आहेत.शेतकºयांची मागणी असेल तर आम्ही शेतीसाठी पाणी सोडू शकतो. मात्र, धरणातून आम्ही दर वेळी कमी प्रमाणात पाणी सोडत असतोच; पण भात शेती केली जाणार असेल तर मात्र शेतीच्या आवश्यकतेनुसार पाणी सोडले जाईल.-भरत काटले,शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड