पनवेल तालुक्यातील १९५० घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:08 AM2020-06-05T00:08:19+5:302020-06-05T00:08:23+5:30
वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : निसर्ग वादळाने पनवेलमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे जीवितहानी झाली ...
वैभव गायकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : निसर्ग वादळाने पनवेलमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे जीवितहानी झाली नसली तरी हजारो घरांचे नुकसान झाले आहे. १२००च्या आसपास झाडे कोलमडून पडली असून मोठ्या संख्येने विजेचे खांब कोसळले असल्याने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागाला या तडाख्याचा मोठा फटका बसला असून घरांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली. तालुक्यात सुमारे ३५० विजेचे खांब कोसळल्याने अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जवळजवळ ५० हेक्टरमधील शेती प्रभावित झाली आहे. बुधवारी दुपारी आलेल्या या वादळामुळे खारघर शहरातील मुर्बी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची पडझड झाली आहे. शाळेची भिंत, छप्पर पूर्णपणे कोसळले आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, खांदा कॉलनी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत.
आज पाणीपुरवठा खंडित
एमजीएपीच्या भोकारपाडा जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाºया वीजवाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडल्याने त्या दुरु स्त करण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार आहेत. यामुळे नवीन पनवेल, कळंबोली, पनवेल, करंजाडे येथील पाणीपुरवठा
५ जूनला बंद राहणार आहे. ६ जून रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली आहे.
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात या वादळामुळे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. झालेल्या नुकसानीचे अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना शासनाकडून मदत मिळेल.
- अमित सानप, तहसीलदार, पनवेल