खोपोली, खालापूरला झाडे पडल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:38 AM2020-06-04T00:38:47+5:302020-06-04T00:38:56+5:30
नितीन भावे। लोकमत न्यूज नेटवर्क खोपोली : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी खोपोली, खालापूरकरांना चांगलाच तडाखा दिला. शेकडो वृक्ष उन्मळून पडले. ...
नितीन भावे।
लोकमत न्यूज नेटवर्क
खोपोली : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी खोपोली, खालापूरकरांना चांगलाच तडाखा दिला. शेकडो वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांब पडले. तारा पडल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अनेक घरांवरचे, इमारतींवरचे पत्रे उडून गेले. त्यामुळे करोडोंचे नुकसान झाले आहे. हजाराहून अधिक जणांना वेगवेगळ्या शाळांमध्ये सुरक्षित स्थळी आणण्यात आले होते.
बुधवारी सकाळी १० वाजल्यापासूनच शहरात वारे वाहण्यात सुरुवात झाली होती. पाऊसही हलका होता. परंतु ११ वाजल्यानंतर मात्र पावसाने आणि वाऱ्याने जोर पकडला. दुपारी १ वाजल्यानंतर तर प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. ताशी ३५ ते ४० किलोमीटर या वेगाने वारे वाहत होते. शहराच्या प्रत्येक भागामध्ये झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. खोपोलीत ४०० ते ५०० झाडे पडण्याचा अंदाज नगराध्यक्षा औसरमल यांनी व्यक्त केला आहे
प्रचंड वेगाने वाहणाºया वाºयामुळे विजेचे खांब पडले आहेत. अनेक ठिकाणी तारांवर झाडे पडली आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक ते दोन दिवस लागू शकतात असे वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी कळवले आहे.