शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

पावसामुळे नुकसान : माणगावमध्ये ४४१२ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 12:56 AM

पावसामुळे नुकसान : बळीराजा सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत

माणगाव : अवेळी झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबतचे माणगाव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती तहसीलदार माणगाव व कृषिविभागाकडून दिली आहे. तालुक्यातील बाधित एकूण संख्या १८७ आहे तर पंचनामे झालेली पूर्ण गावसंख्या १६७ आहे. एकूण पिकाखालील क्षेत्र १२२५० हेक्टर असून हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी संख्या ४४१२ व एकूण क्षेत्र १३५०.०६ हेक्टर असून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

पंचनामे पूर्ण क्षेत्रापैकी कापणी पश्चात पिकांचे नुकसान ग्रस्त शेतकरी संख्या २७४ व ८७.५० हेक्टर क्षेत्र तसेच उभ्या पिकांचे नुकसान ग्रस्त शेतकरी संख्या ४१३८ व एकूण क्षेत्र ११४२.५६ हेक्टर आहे. पंचनामे पूर्ण क्षेत्रापैकी विमा संरक्षित संख्या २१ व त्यांचे क्षेत्र ४.२० हेक्टर आहे. तसेच १६७ गावे व उर्वरित गावांचे पंचनामे प्रगतीपथावर असून बाधित क्षेत्र व खातेदार संख्या वाढणार अशी माहिती देण्यात आली.तालुक्यातील बहुतांश सर्व शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय आहे. यावर त्यांच्या कु टुंबाचा उदरनिवाह होतो; मात्र परती पाऊस आणि क्यार, महा या सारख्या चक्रीवादळामुळे होणार अवकाळी पाऊस यामुळे कापणीला आलेले भात पीक नष्ट झाले आहे. यामुळे शेतकºयाची महेनतच पाण्यात गेली आहे. शासनाने महसूल विभागाकडून पंचनामेची कामे प्रगती पथावर चालू असून यावेळी प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे व तालुका कृषि अधिकारी पी.बी. नवले यांनी भादाव गावात जाऊन संयुक्त पाहणी केली.तालुका कृषि अधिकाºयांनी शेतकºयांनी सध्या शेतीच्या अंगवलीवरती हरभरा , मूग , मटकी , चवळी , पावटा, वाल अशा द्विदल धान्याची लागवड करावी. सध्याची शेतीची जागा उशिरा राहिलेल्या पावसाने ओली रहाणार आहे कडधान्य शेतकºयाने पेरल्यास चांगले पीक घेता येईल असे सांगितले.मुरूडच्या ११७० हेक्टरला फटका1आगरदांडा : राज्यात आवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहे. या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने मुरुड तहसीलदार गमन गावीत यांनी गेले चार दिवस स्व:त तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कुषिअधिकारी सुरज नामदास यांच्या समवेत तालुक्यातील प्रत्येक गावातील २९५६ शेतबांधावर ११७० हेक्टर शेतीची पाहणी करून पंचनामे के ले आहे. ८० लाखा पेक्षा जास्त नुकसान झाले असून या शेतकºयांना लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल असे तहसीलदार गावीत यांनी सांगितले.2मुरुड तालुक्यात ४५०० मिलीमीटर एवढा पाऊस त्याचप्रमाणे अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले होते. शेतात भाताच्या लोंबी तयार झाल्या होत्या परंतु अवकाळी पावसामुळे आलेले भात पीक शेत जमिनीत गाडले गेल्याने आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते.3भात पिकांबरोबरच सुपारी व इतर कडधान्य पिकांना सुद्धा अवकाळी पावसाने नुकसानीची झळ सोसावी लागली होती. याबाबत मुरुड तहसीलदारांनी यांनी तातडीने पंचनामे करण्यास सुरू वात के ली आहे. मुरुड तालुक्यात काही शेतकºयांच्या ९ ते १० एकर क्षेत्राच्या मोठ्या भात पीक लागवडीच्या जमिनी असून अवकाळी पावसामुळे सर्वच गमावल्यामुळे आता शेतकºयांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड