पोलादपूरमध्ये ८६ लाख १६ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:45 PM2019-11-17T23:45:11+5:302019-11-17T23:45:14+5:30

चार हजार ९१ शेतकऱ्यांना फटका; बँक खाते क्रमांक जमा करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

Damage of Rs | पोलादपूरमध्ये ८६ लाख १६ हजारांचे नुकसान

पोलादपूरमध्ये ८६ लाख १६ हजारांचे नुकसान

Next

- प्रकाश कदम

पोलादपूर : पोलादपूर परतीच्या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. तालुक्यात शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, चार हजार ९१ शेतकऱ्यांचे सुमारे १२६७.२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या पोटी ८६ लाख १६ हजार ९६० रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील दोन ते तीन वर्षांतील धान्य पीक नुकसानीची रक्कम प्रशासनाकडून थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने शेतकºयांनी आपले बँक खाते व सहमती पत्र तलाठी सजा तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन तहसीलदार दीप्ती देसाई यांनी केले आहे.

आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांचे अतोनात नुकसान केले. हाती आलेले पीक वाया गेले असून भविष्यात सुक्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम राहिल्याने शेतकºयांना मदत कधी व केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारण्यात येत आहे.

तालुक्यातील बाधित झालेल्या शेतीची पाहणी तहसील कार्यालयामधील महसूल अधिकारी, तलाठी, कृषी विभाग, ग्रामसेवक यांच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यात पिकाखालील तीन हजार ७०३.६८ हेक्टर क्षेत्र असून, शेतकºयांची संख्या चार हजार ९१ इतकी आहे. या सर्व शेतकºयांचे पंचनामे पूर्ण झाले असून, बाधित झालेले क्षेत्र १२६७.२० हेक्टर असून सुमारे ८६ लाख १६ हजार ९६० रुपयांचे नुकसान झाले आहे.

कापणी झाल्यावर पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या ६४३ असून २६०.९० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर उभ्या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तीन हजार ४५७ शेतकºयांचे सुमारे १००६.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

113 शेतकºयांचे १०१.१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पोलादपूर तालुक्यात ३७७० सरासरी पाऊस पडत असतो. मात्र, यंदा सुमारे ५९०२ पावसाची नवीन विक्रमी नोंद झाली आहे. आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने शेतकºयांना मोठा फटका बसला असून शेतात पाणी साचल्याने पीक कुजले. तालुक्यात पीक विमा संरक्षित शेतकºयांची संख्या तुरळक आहे.

धान्य पीक नुकसानभरपाई रक्कम प्रशासनाकडून तहसील कार्यालयद्वारा थेट शेतकºयाच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी शेतकºयांनी बँक खाते क्रमांक व सहमती पत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापोटी २०१७-१८ वर्षासाठी नुकसानभरपाईसाठी सुमारे ३२ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
- दीप्ती देसाई, तहसीलदार, पोलादपूर

Web Title: Damage of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.