कर्जत-खालापूर तालुक्यासाठी बंधारे मंजूर; सिमेंट काँक्रीटचा वापर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 01:34 AM2021-03-28T01:34:49+5:302021-03-28T01:34:58+5:30
महेंद्र थोरवे यांनी केले भूमिपूजन
कर्जत : मागील काही काळात कर्जत व खालापूर तालुक्यातील पाणीटंचाई ग्रस्त गावाचा आमदार महेंद्र थोरवे यांनी पाहणी दौरा केला होता. त्यावेळी नद्यांची पाहणी केली होती व यासंबंधी पाणी अडवून त्याचा वापर गावकऱ्यांसाठी कसा करता येईल याबद्दल नियोजन करण्यात आले होते. त्या बाबतीत लगेच कार्यवाही करून सिमेंट काँक्रीट बंधारे मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. ते प्रयत्न यशस्वी झाले असून त्या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शनिवारी पार पडला.
जलसंधारण विभाग तसेच जिल्हा नियोजनअंतर्गत कर्जत तालुक्यातील कळंब -(निधी १५.१४ लाख), किकवी-(निधी ५८.५४ लाख), कुरुंग-(निधी २४.९० लाख), पाथराज- (निधी ३७.४५ लाख), बोरगाव- (निधी ६४.८८ लाख), लोभेवाडी-(निधी ८०.५९ लाख) तर खालापूर तालुक्यातील ताडवाडी- (निधी ७९.५८ लाख) बंधारा मंजूर करण्यात आला आहे. तसेच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, यादरम्यान काल्याची वाडी अंत्राट येथे चालू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी यावेळी केली. या कामामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
या वेळी उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, शिवराम बदे, उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, दिलीप ताम्हाणे, विभाग प्रमुख रवी ऐनकर, योगेश दाभाडे, बाजीराव दळवी , माजी सरपंच रामचंद्र मिणमिने, पाथरज सरपंच अंकुश घोडविंदे आदी उपस्थित होते.
या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी साठविणे सहज शक्य होईल तसेच स्थानिकांना त्या पाण्याचा वापर सर्वाधिक काळ करता येईल. होऊ घातलेल्या बंधाऱ्यामुळे स्थानिकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आज विशेष आनंद झाला आणि यामुळे ही विकासकामे अशीच अविरत सुरू राहतील, असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी याप्रसंगी गावकऱ्यांना दिला.वाडी अंत्राट येथे चालू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी यावेळी केली.