पंढरपूरला पायी दिंडी मार्गस्थ; विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:27 AM2018-07-07T00:27:40+5:302018-07-07T00:27:50+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील वारकरी शुक्रवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. रायगड जिल्ह्याचे वारकरी सांप्रदाय पंथाचे आधारस्तंभ ह.भ.प.रामचंद्रबुवा बाल्या वागे तथा सुखानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्तजन या दिंडीत सहभागी होतात.
दांडगुरी : श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील वारकरी शुक्रवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. रायगड जिल्ह्याचे वारकरी सांप्रदाय पंथाचे आधारस्तंभ ह.भ.प.रामचंद्रबुवा बाल्या वागे तथा सुखानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्तजन या दिंडीत सहभागी
होतात.
भरडखोलवरून निघालेली दिंडी म्हसळा मार्गे गोरेगाव, महाड, वरंध, हिर्डीशी, भोर, शिरवळ, लोणंद माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील होऊन फलटण, नातेपुते, माळशिरस, वाकरी मार्गे पंढरपूर अशी जाते. ठिकठिकाणी मुक्काम करत दिंडीचा प्रवास सुरू असतो.
गेली ३३ वर्षे सलग १८ दिवसांचा प्रवास वारकरी करीत असतात. प्रवासात टाळ, पताका, मृदुंग हरिनामाच्या गजरच्या समूहात १५० ते २०० वारकरी सांप्रदाय भक्तगणासह दिंडी भरडखोल सागराचे तीर्थ
घेऊन पंढरपूर या ठिकाणी
चंद्रभागेमध्ये अर्पण करण्याकरिता व भगवान विठ्ठलाच्या दर्शनाकरिता पंढरपूरकडे रवाना होत आहेत.