शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

‘कर्नाळ्याचे’ अस्तित्व धोक्यात

By admin | Published: July 10, 2015 12:14 AM

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्लाही याला अपवाद राहिलेला नाही

वैभव गायकर पनवेलऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्लाही याला अपवाद राहिलेला नाही. कर्नाळा किल्ल्यावरील सुळक्याला सध्या चिरा पडत असल्याने किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वातावरणाच्या बदलामुळे हे परिणाम होत आहेत. प्राचीनकाळी पनवेल व बोर घाटातून मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत होता. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते. किल्ल्याचे बांधकाम नक्की कोणी केले, याचा नेमका पुरावा नसला तरी यादवांनीच तो बांधला असल्याचे बोलले जाते. निजाम, मराठे, पोर्तुगीज या सर्वांच्या इतिहासाचा साक्षीदार हा किल्ला आहे. १८१८ पर्यंत क्रांतिवीर वासुदेव बळंवत फडके यांचे आजोबा कर्नाळ््याचे किल्लेदार होते. याच कर्नाळ््याच्या इतिहासामुळे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. वृक्षतोड, प्रदूषणामुळे याठिकाणचे प्राणी, पक्षी देखील हळूहळू नष्ट होत गेले तसेच विविध औषधी वनस्पती देखील याठिकाणाहून नामशेष झाल्या आहेत. कर्नाळा किल्ल्यात ‘जैत रे जैत’सारख्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. यावेळी याठिकाणच्या सुळक्याला लिंगोबाची उपमा देण्यात आली होती. महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटक याठिकाणी गिर्यारोहण(टे्रकिंग)साठी येत असतात. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असल्याचे आपणास पाहावयास मिळते तसेच तटबंदी देखील गायब होत चालली आहे. सुळक्याच्या पायथ्याशी १२ पाण्याचे हौद व धान्याची कोठारे आहेत. यापैकी एका हौदाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून योग्य उपाययोजना आजवर होताना दिसून आलेल्या नाहीत. याठिकाणी प्रसिद्ध असलेल्या पक्षी अभयारण्यात पर्यटनप्रेमींपेक्षा संख्या दिवसेंदिवस वाढत आह. कर्नाळा किल्ल्याचे ऐतिहासीक महत्व पाहता याठिकाणच्या बुरुजाच्या संवर्धनासाठी शासनाने तत्काळ पावले उचलावीत यासाठी मी शासनाच्या संबधीत खात्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे गडकिल्ले अभ्यासक विजय खिल्लारे यांनी सांगितले.