शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

श्रीवर्धन शहरामधील गणेश आळीवर दरड कोसळण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:38 PM

नगरपालिकेची प्रतिबंधात्मक उपाययोजना ; ११ जीर्ण इमारतींना नगरपालिके च्या नोटिसा

श्रीवर्धन : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचे जोरदार पडसात सर्वत्र उमटत आहेत. श्रीवर्धन शहरातील गणेश आळीच्या उत्तर विभागास दरडीचा धोका निर्माण झाला आहे तसेच श्रीवर्धन शहरातील ११ जीर्ण झालेल्या इमारतीच्या मालकास नगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.१ आॅगस्टपासून श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे २ आॅगस्टच्या रात्री गणेश आळीतील डोंगराळ भागावरील दरड कोसळली. हे वृत्त समजल्यानंतर श्रीवर्धन शहराचे नगराध्यक्ष ,तहसीलदार,मुख्याधिकारी, अभियंता यांनी समक्ष जाऊन दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केली आहे. गणेश आळीत सुमार १५० च्या जवळपास लोकांची वस्ती आहे. त्यापैकी ७ ते ८ घरांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या आपत्तीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने संबंधित दरड प्रवण क्षेत्रातील लोकांसाठी श्रीवर्धन नगरपरिषदेची शाळा नंबर १ व पर्यटन निवासाची वास्तू तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उपलब्ध केली आहे. परंतु दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही ही चिंतेची बाब असून नगरपालिका प्रशासनाकडून जनतेला सहकायाचे व सुरक्षेचे आव्हान करण्यात येत आहे. श्रीवर्धन शहरातील जीर्ण अवस्थेतील ११ निरमनुष्य इमारतीस नगरपालिकेकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्यामध्ये मधला कोळीवाडा, मुकादम भाट, वेताळ पाखाडी, चौकर पाखाडी, साळीवाडा, शिवाजी चौक , सिद्धार्थ नगर, ओजाळे पाखाडी, वरचा जीवना व रफी अहमद किडवई मार्ग येथील इमारतीचां सामावेश आहे. नगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.श्रीवर्धन नगरपालिका गणेश आळीतील जनतेच्या सोबत आहे. नगरपालिकेने त्यांच्या सुरक्षेचे दायित्व स्वीकारले असूनदरड प्रवण क्षेत्रातील लोकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.- नरेंद्र भुसाने, नगराध्यक्ष, श्रीवर्धनगणेश आळीतील उत्तर विभागातील ७ ते ८ घरांना दरडीचा धोका आहे. गेल्या वर्षीच्या पावसात सुद्धा संबंधित घरांना काही स्वरूपात नुकसान झाले होते त्यामुळे संबंधित लोकांना आर्थिक फटका पोहोचलेला आहे. तरी यावर्षीच्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गणेश आळीतील लोकांनी कुठलाही धोका पत्करू नये जेणेकरून त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल- अनंत गुरव, नगरसेवक, श्रीवर्धनदरड प्रवण क्षेत्रातील लोकांच्या सुरक्षतेची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना केली आहे. नगरपालिकेच्या शाळा नंबर एक व पर्यटन निवास तात्पुरत्या स्वरूपात निवाºयासाठी तयार ठेवले आहे. जनतेने दरड समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिकेला सहकार्य करावे.- किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी