बंधाऱ्याच्या दुरवस्थेमुळे धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:31 AM2019-09-15T00:31:23+5:302019-09-15T00:31:32+5:30

महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.

Danger due to malfunction | बंधाऱ्याच्या दुरवस्थेमुळे धोका

बंधाऱ्याच्या दुरवस्थेमुळे धोका

Next

- सिकंदर अनवारे 
दासगाव : महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. बंधाºयावरील मार्गावर खड्डे पडले असून ऐन पावसाळ्यात पुराचे पाणी गेल्याने बंधाºयाचे नुकसान झाले आहे. या बंधाºयाच्या एका बाजूचा माती भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असला तरी लघू पाटबंधारे विभागाने या मार्गावरील वाहतूक सुरूच ठेवली आहे.
कोल्हापूर पद्धतीने बांधलेल्या या बंधाºयावरून खरवली आणि बिरवाडी या दोन्ही गावांतील ग्रामस्थ ये-जा करतात. खरवली आणि बिरवाडीमध्ये असलेल्या शाळांमधील विद्यार्थीदेखील या मार्गाचा वापर करतात. बंधाºयावरील मार्ग अत्यंत खराब आणि खाचखळग्यांचा झाला आहे. ज्या नदीवर हा बंधारा बांधला आहे त्या काळ नदीचे पात्र आणि पाण्याचा प्रवाह ऐन पावसाळ्यात रौद्र रूप धारण करून असतो. प्रचंड आवाज करीत पाण्याचा प्रवाह येथून सावित्री नदीला मिळतो. अनेकवेळा या बंधाºयावरूनदेखील पाणी जाते. अशा वेळी हा मार्ग बंद होतो. काही दिवसांपूर्वी या बंधाºयावरून पाणी गेल्याने मोठे वृक्ष यावर आदळले गेले आहेत. काही वृक्ष या ठिकाणी अडकले आहेत. यामुळे हा बंधारा धोकादायक बनला आहे. या बंधाºयावरून यापूर्वीच अवजड वाहतूक बंद केली आहे. मात्र तरीदेखील अनेक वेळा मोठी वाहने यावरून ये-जा करीत असतात. येथील लघू पाटबंधारे विभागाचे सुरक्षा विभाग कार्यालयदेखील बंद आहे. त्याचीदेखील मोडतोड झाली आहे. बंधाºयाच्या एका बाजूचा माती भरावदेखील वाहून गेला आहे. यामुळे हा मार्ग बंद करणे गरजेचे असतानादेखील याकडे संबंधित विभागाने कानाडोळा केला आहे. यामुळे ये-जा करणारे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
बिरवाडी गावाजवळ काळ नदीवर कोल्हापूर पद्धतीने सन १९७६ रोजी बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाºयामुळे बिरवाडी आणि परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या बंधाºयातील पाणीसाठ्यापैकी काही भाग सिंचनाकरितादेखील राखीव आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांनादेखील याच पाण्याचा वापर करता येतो. १.६९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा यामध्ये होत असून ४.५६ हेक्टर क्षेत्र बुडीत गेले आहे. प्रतिवर्षी सिंचन आणि पाणीपुरवठा यातून लघू पाटबंधारे विभागाला किमान ६० लाख रुपयांचे उत्पन्न होत असले तरी या बंधाºयाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. लोखंडी प्लेट्स आणि मजबुतीकरण याकरिता सन २०१४ मध्ये लाखो रुपये खर्च करण्यात आले, मात्र या बंधाºयावरील मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही.
>मागच्या दोन वर्षांत धरणाच्या वरच्या बाजूला काँक्रिटची दुरुस्ती आणि खालील स्टील काँक्रिटची दुरुस्ती याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मान्यता मिळत नसल्याने ते काम थांबले आहे. या वर्षी वरचे काँक्रिट दोन्ही ठिकाणी वाहून गेल्यामुळे दुरुस्तीसाठी वरील कार्यालयाकडे अंदाजपत्रक पाठविण्यात आले आहे. मान्यता मिळताच काम केले जाईल.
- प्रकाश पोळ,
शाखा अभियंता, लघू पाटबंधारे विभाग

Web Title: Danger due to malfunction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.