समुद्राखालून वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:43 AM2020-08-24T02:43:24+5:302020-08-24T02:43:27+5:30
बंदरातील समुद्र चॅनेलमध्ये टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया नावाचे मालवाहू जहाज मागील एक-दीड वर्षांपासून जेएनपीटीच्या न्हावा बेसजवळील अॅकरपॉइंटवर नांगरून ठेवण्यात आले आहे.
उरण : जेएनपीटी बंदरातून एकही कर्मचारी नसलेले एक मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून अॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाºयाजवळ भरकटले. या जहाजामुळे घारापुरी बेटाला समुद्राखालून वीजपुरवठा करणाºया वीजवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे.
बंदरातील समुद्र चॅनेलमध्ये टॅग आॅफशोअर कंपनीचे टॅगनोया नावाचे मालवाहू जहाज मागील एक-दीड वर्षांपासून जेएनपीटीच्या न्हावा बेसजवळील अॅकरपॉइंटवर नांगरून ठेवण्यात आले आहे. ही कंपनी आर्थिक संकटात आल्याने कामकाज ठप्प झाले. कर्ज असल्याने कंपनीचे हे मालवाहू जहाज एका बहुराष्ट्रीय बँकेने ताब्यात घेतले आहे. हे जहाज बँकेने जेएनपीटीच्या ताब्यात दिले आहे.
एकही कर्मचारी नसलेले हे जहाज नुकत्याच झालेल्या वादळीवाºयात अॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाºयाजवळ इकडून तिकडे भरकटत चालले आहे. काही दिवसांपासून भरकटलेल्या जहाजामुळे घारापुरी बेटाला समुद्राखालून वीजपुरवठा करणाºया वीजवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत जेएनपीटीशी संपर्क साधण्यात आला आहे. भरकटलेल्या जहाजाची दखल जेएनपीटी प्रशासनाकडून घेण्यात आली असल्याचे घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले, तर हे जहाज लवकरच जेएनपीटीच्या न्हावा येथील अॅकरपॉइंटपर्यंत आणण्यात येणार असल्याची माहिती दिली.