-कांता हाबळेनेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावरील वादग्रस्त विद्युत पोल अद्याप काढण्यात न आल्याने ग्रामस्थ व प्रवासी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या बेकायदेशीर कामाच्या परवानग्या व मान्यता आदेश रद्द करण्यात आलेले असताना अद्याप हे अनधिकृत धोकादायक पोलकाढण्यात आलेले नाहीत, यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.नेरळ-कळंब रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी वरई येथील एका गृहप्रकल्पास विद्युतपुरवठा करण्यासाठी पोल टाकण्याचे काम सुरू होते. अतिविद्युत दाब वाहिनीचे हे पोल बेकायदा साइडपट्टीवर टाकले जात होते. ते प्रवासी, वाहतूकदार सर्वांसाठीच धोकादायक असल्याने ग्रामस्थांनी या कामास आक्षेप घेऊन विरोध केला.ग्रामस्थ व स्थानिक यांच्या तक्र ारीनंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण या दोन्ही विभागांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांना आंदोलन उभारावे लागले, ग्रामस्थांच्या आंदोलनात्मक पवित्र्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी आदेश काढून या बेकायदा कामाची परवानगी व मान्यता आदेश रद्द केले. तसेच हा पोल त्वरित काढून टाकण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले आहेत.यानंतर साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही हे अतिक्र मण दूर करण्यात आलेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही आतापर्यंत दुर्लक्ष केले आहे.हो पोल लवकरात लवकर काढण्यात येईल - घुळेसार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजयकुमार सर्वगौड, महावितरणचे उप अभियंता आनंद घुळे यांनी हा पोल आम्ही लवकरात लवकर काढून टाकतो, असे वारंवार सांगितले होते. कार्यकारी अभियंता पनवेल यांची भेट घेतली असता आम्ही अनधिकृत काम काढून टाकण्याबाबत आदेश पाठवतो, असे अभियंता यांनीदेखील सांगितले होते. मात्र, अद्याप कु ठलीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त के ली आहे.पोशीर रस्त्यावरील पोलसंदर्भात आमचे उप अभियंता यांच्याशी चर्चा केली असून तशी उपकरणे तयार करण्यात येणार आहेत व ते डिव्हिजन आॅफिसला सादर करण्यात येणार आहेत. ते मंजूर झाल्यास लवकर पोल काढण्यात येणार आहेत. कारण रुं दीकरण करताना ते पोल अडथळा ठरणार आहेत, तसेच पोशीरमधील काही ग्रामस्थांनी हे पोल टाकण्यास काही हरकत नाही, या कामास परवानगी देण्यात यावी, असे पत्र दिले आहे; परंतु त्यांना पत्र देण्याचा कोणताही अधिकार नाही.- आर. एम. वेलदोडे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-कर्जतपोशीर रस्त्यावरील पोल टाकण्याच्या परवानग्या रद्द झाल्या आहेत. पोल काढण्यासाठी प्रोसेस सुरू केली आहे. आठवडाभरात पोल काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.- आनंद घुळे, उप अभियंता, महावितरण, कर्जतफोडलेला रस्ता करणार कधी?नेरळ : नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोहचीवाडी येथून खांडा विभागापर्यंत पाण्याच्या लाइनचे काम नेरळ ग्रामपंचायतीकडून सुरू करण्यात आले होते. हे काम करत असताना ठेकेदाराने पाण्याच्या पाइपलाइनसाठी रस्ताचा भाग खोदला. मात्र, या कामाला मोहचीवाडी ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यामुळे ते काम ग्रामपंचायतीने थांबविले. दरम्यान, काम थांबविल्यानंतर खोदलेला रस्ता आम्हाला पूर्ववत करून द्या, या मागणीला एक महिना उलटूनही रस्ता केला नसल्याने करणार कधी? हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील अनेक भागात कमी दाबाने पाणी जाते. परिणामी, ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. असेच खांडा भागात पाण्याचे नियोजन करण्यासाठी मोहाचीवाडी येथून टाकीवरून नवीन ४ इंची लाइन टाकून पाणी देण्यात येणार होते. यासाठी मोहाचीवाडी येथील मुख्य रस्त्याचा काही भाग ठेकेदाराने खोदला होता. मात्र, आम्हालापण पाणी कमी येते आणि आम्हाला विश्वासात न घेता ग्रामपंचात नेरळने हा घाट कसा घातला, असा प्रश्न उपस्थित करत मोहाचीवाडी ग्रामस्थांनी ते काम थांबविले होते. ग्रामपंचायत नेरळमध्ये या विषयी चर्चा झाल्यानंतर ते काम थांबून रस्ता पूर्ववत करून देऊ, असे आश्वासन प्रशासनाकडून दिले होते. मात्र, महिना उलटूनही ते काम न झाल्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे.नेरळ- खांडा व अन्य भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतच्या वतीने नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले होते, ते काम येथील ग्रामस्थांनी अडवले असल्याने रस्त्याचे काम करण्यात आले नाही, पाइपलाइन टाकून झाल्यास रस्ता तयार करण्यात येणार आहे. - अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ ग्रापंचायतनेरळ ग्रामपंचायतने मोहाचीवाडी येथे जाणार रस्ता महिना भरापासून खोदून ठेवल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, चार दिवसांत रस्ता तयार करून दिला जाईल, असे सांगण्यात आले; परंतु महिना उलटूनही रस्ता चांगल्या दर्जाचा केला नाही, रस्ता झाला नाही तर पावसाळ्यात वाहने चालवणे धोक्याचे होणार आहे, त्यामुळे हा रस्ता तत्काळ करावा अन्यथा या रस्त्यांसाठी आंदोलन करावे लागेल.- भगवान चव्हाण, ग्रामस्थ, नेरळ, मोहाचीवाडीरस्ता न झाल्यास आंदोलनहा रस्ता चार दिवसांत करून देतो, असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगूनही आजवर तो न झाल्यामुळे तो होणार तरी कधी? हा प्रश्न उपस्थित करत लवकर रस्ता न झाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.तर रस्ता करण्याच्या बाबीवर विचार सुरू आहे. लवकरच मोहचीवाडी येथील रस्ता पूर्ववत करू, असे जरी ग्रामपंचायतीने सांगितले.
नेरळ-कळंब रस्त्यावर वाहतुकीस धोका, पोशीर रस्त्यावरील विद्युत खांब जैसे थे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 4:10 AM