पेशवाई रस्त्यावरील पूल धोकादायक, नेरळमधील रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:41 PM2020-09-13T23:41:44+5:302020-09-13T23:42:00+5:30
२०१६ मध्ये नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरणमधील दामत रेल्वे फाटक ते साई मंदिर असा रस्ता बनविण्यात आला होता. मातीचा भराव करून बनविण्यात आलेल्या रस्त्यात डांबरीकरण, तसेच दोन लहान पूलही बांधण्यात आले होते.
- कांता हाबळे
नेरळ : नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरणमधून बांधण्यात आलेल्या रस्त्याची आणि पुलाची दयनीय स्थिती झाली आहे. रस्त्यावरील एका पुलाला एका बाजूला भगदाड पडले असून, दुसऱ्या पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील पूल कधीही कोसळू शकतो, तर डांबरी रस्ता शोधण्याची वेळ आली आहे.
२०१६ मध्ये नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरणमधील दामत रेल्वे फाटक ते साई मंदिर असा रस्ता बनविण्यात आला होता. मातीचा भराव करून बनविण्यात आलेल्या रस्त्यात डांबरीकरण, तसेच दोन लहान पूलही बांधण्यात आले होते. मात्र, त्यावेळी पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती आणि तेव्हापासून खड्डेमय रस्त्यातून वाहनचालक मार्ग काढत पुढे जात आहेत. कल्याण-कर्जत रस्त्याला दामत गावाच्या पुढे हा रस्ता कशेळे, कळंब भागाकडे जाण्यासाठी निघत असल्याने वाहनांची वाहतूकही चांगल्या प्रकारे असायची. त्याच वेळी माथेरान-नेरळ-कळंब या रस्त्याला हा पेशवाई रस्ता जोडला जात असल्याने, नेरळ गावात न जाता थेट कल्याण रस्त्याला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग बनला होता, परंतु त्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. मागील चार वर्षांत एकदाही रस्त्याची दुरुस्ती केली नाही.
त्यात या रस्त्यावरील दोन लहान पूल हे बनविल्यापासून कमकुवत होते आणि त्यामुळे त्या दोन्ही पुलांनी आता समस्या निर्माण केली आहे. त्यातील एका पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर बाहेर आल्या आहेत.
पुलाची दुरु स्ती तातडीने करण्याची मागणी
- पूल वाहतुकीस बंद केला, तरी त्या पुलाची दुरुस्तीबाबत नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरण अनेक वेळा तक्रारी करून, उपोषण करूनही काहीही बोलण्यास तयार नाही. ही बाब लक्षात घेता, पूल कोसळल्यास पेशवाई रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद होईल आणि नेरळ गावात न जाता परस्पर प्रवास करणाºया
वाहनांसाठी प्राप्त असलेला पर्यायी
मार्ग बंद होईल.
त्यामुळे जबाबदारी घेऊन नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरण आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी धामोते
गावचे शिवसेना
शाखाप्रमुख दत्तात्रय
विरले यांनी केली.
खड्ड्यामध्ये साचले पाणी
दामत गावाकडील पुलाला एका बाजूला भगदाड पडले असून, पुलावर साचून राहत असलेल्या पावसाच्या
पाण्याने ते भगदाड कळून
येत नाही.
आमच्या विभागाशी संबंधित हा रस्ता नाही, परंतु रस्त्याच्या स्थितीबाबत तत्काळ नेरळ विकास प्राधिकरण यांना कळविणार आहे.
- प्रल्हाद गोपणे,
प्रभारी उपअभियंता,
बांधकाम विभाग, जिल्हा परिषद