माणगाव : शहरातील माणगाव-निजामपूर-पुणे रस्त्यावर भारत गॅस एजन्सीसमोर असणारे वडाचे झाड धोकादायक ठरत होते. खूप जुने झाड असल्याने त्याच्या पारंब्या वाढलेल्या असल्याने हे झाड अपघाताला कारणीभूत ठरत होते. ९ फेब्रुवारी रोजी या झाडाजवळच अपघातात १२ वर्षीय मुलगी मृत्युमुखी पडली. यामुळे हे वडाचे झाड तोडण्याची मागणी येथील नागरिक करीत होते, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत संबंधित प्रशासनाने हे झाड तोडले आहे.वडाचे हे झाड डांबरी रस्त्याला लागून होते. त्या ठिकाणचा रस्ता वळणाचा असून, तेथे थोडा चढही आहे, यामुळे महामार्गापासून निजामपूरकडे जात असताना या ठिकाणी आल्यावर समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे समोरील वाहन दिसत नाही आणि अपघातात घडत आहेत.या ठिकाणी याआधी अनेक अपघात झाले आहेत. तसेच या ठिकाणी पादचाऱ्यांची रेलचल खूप मोठ्या प्रमाणात असते. मोठा ट्रक वा बस आली, तर या झाडाच्या पारंब्या गाड्यांना लागत होत्या, त्यामुळे ही मोठी वाहने आपली साइड सोडून दुसºया साइडला येत होती. समोरील वाहनांस जर अंदाज नाही आला तर अपघात घडत होते. हे झाड म्हणजे अपघाताला निमंत्रण झाले होते. तरी संबंधित विभागाने या झाडाला तोडले पाहिजे, अशी मागणी येथील नागरिक करीत होते.पादचाऱ्यांचा त्रास होणार कमीअपघात टाळता यावे व पादचाºयांचा त्रास कमी करण्यासाठी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.याचीच दखल माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष योगिता चव्हाण व नगरपंचायतचे सर्व नगरसेवक यांनी घेतली आणि प्रयत्न करून हे झाड तोडून घेतले. त्यामुळे आता त्या ठिकाणी होणारे अपघात नक्कीच टाळता येतील.
निजामपूर रस्त्यावरील धोकादायक झाड तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:38 AM