कुरिअरच्या पैशावर डल्ला, दोघांनी मिळून केला तीन लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 04:45 AM2018-04-05T04:45:35+5:302018-04-05T04:45:35+5:30
रोहामध्ये कुरिअरवाल्यांनी संगनमत करून जमलेल्या तब्बल ३ लाखांहून अधिक रु पयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. रोहा येथील इ-कॉम एक्स्प्रेस कुरिअर कंपनीत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी
- मिलिंद अष्टिवकर
रोहा - रोहामध्ये कुरिअरवाल्यांनी संगनमत करून जमलेल्या तब्बल ३ लाखांहून अधिक रु पयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
रोहा येथील इ-कॉम एक्स्प्रेस कुरिअर कंपनीत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी सुपरवायझर किशोर शिवाजी सावंत रा. तांबडी बुद्रुक तसेच डिलिव्हरी बॉय कल्पेश केशव शिंदे रा. मुठवली यांच्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहेत.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी इ-कॉम एक्स्प्रेस कुरियर कंपनीच्या रोहा कार्यालयात काम करत असताना कुरियर डिलिव्हरी करून जमा झालेले पैसे कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरले आहेत असे निदर्शनास आले. यामुळे फिर्यादी सचिन कलेराव पवार रा. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स कामोठे, नवी मुंबई यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. त्यांना डिलिव्हरीचे मिळालेले एकूण ३,१५,६७0 रु .चा अपहार करून कंपनीचा विश्वासघात केल्या प्रकरणी अजीमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.ना. गदमले हे करीत आहेत.