श्रीवर्धन : चक्रीवादळाने श्रीवर्धनचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. नैसर्गिक संपत्तीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यासोबत माणसांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक सेवा व सुविधा खंडित झाल्या आहेत. संपूर्ण श्रीवर्धनमधील वीजपुरवठा गेल्या ३ जूनपासून खंडित आहे. त्याचा परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. गुरुवारी श्रीवर्धनमधील विद्युत महावितरणचे सबस्टेशन पूर्ववत झाले आहे. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये लवकरच वीजपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.श्रीवर्धन तालुक्यात लहान-मोठी जवळपास ७८ गावे आहेत. श्रीवर्धनची आजमितीची लोकसंख्या ८२ हजारच्या जवळपास आहे. निसर्ग सौंदर्य ही श्रीवर्धनची खरी ओळख होती. मात्र, चक्रीवादळाने हजारो वृक्षवेली नष्ट केल्या आहेत. तालुक्यातील सर्व गावांचे वादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या अनेक खांबांची दुरवस्था झाली आहे. विद्युतवाहक तारा तुटल्या आहेत. पथदिवे फुटले आहेत. अनेक घरांतील जोडण्या वाºयामुळे तुटल्या आहेत. श्रीवर्धनच्या भौगोलिक परिस्थितीमुळे कामात असंख्य अडचणी येत होत्या. मात्र, कर्मचाऱ्यांनी जिद्दीने काम केले आहे. चक्रीवादळाने महावितरणाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाघपैंजन यांनी सांगितले आहे. आजमितीस जिल्ह्याबाहेरील अनेक ठेकेदार श्रीवर्धनमध्ये आले आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी भरपावसात काम करताना दिसत आहेत. युद्धपातळीवर होणाºया कामांमुळे सर्वसामान्य माणसाला वीजपुरवठा लवकर सुरू होण्याची आस लागली आहे. श्रीवर्धनला वीजपुरवठा करणारी मुख्य विद्युत वाहिनी पाबरा येथून येते. स्थानिक महावितरणचे कर्मचारी व वाशी, पालघर, ठाणे आणि मालेगाव येथून आलेल्या कर्मचाºयांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत. श्रीवर्धन बागमांडला फिडर, श्रीवर्धन शहर फिडर, जांभूळ फिडर व श्रीवर्धन बोर्ली फिडर या सर्व ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहेत.श्रीवर्धन शहराचा विद्युत पुरवठा लवकरच सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्व कर्मचारी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहेत जनतेने सहकार्य केले, त्याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे .- महेंद्र वाघपैंजन, उपकार्यकरी अभियंता श्रीवर्धननिसर्ग चक्रीवादळाने सर्वांचे अतोनात नुकसान झाले आहे. महावितरणच्या सर्व कर्मचाºयांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. लवकरच श्रीवर्धनचा वीजपुरवठा सुरळीत होईल.- रितेश मुरकर, वर्कर फेडरेशन, गोरेगाव विभाग
श्रीवर्धन तालुक्यातील अंधार होणार दूर; प्रकाशाच्या दिशेने वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:15 AM