शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

By admin | Published: October 09, 2016 2:53 AM

दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर विशाल पाटील दीर्घकालीन रजेवर गेल्याने रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पाटील यांच्या रजेबाबत वरिष्ठांना

दासगाव : दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर विशाल पाटील दीर्घकालीन रजेवर गेल्याने रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पाटील यांच्या रजेबाबत वरिष्ठांना काहीही माहिती नाही. यापूर्वीही असे प्रकार घडल्याने पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जवळपास २२ गावांच्या ग्रामस्थांची वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. अपघातानंतर बहुतांश रुग्णांना प्रथम याच आरोग्य केंद्रात आणले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे जिल्हा आणि तालुका प्रशासन मात्र दुर्लक्ष करून संबंधित डॉक्टरांवर केवळ कारवाईचे कागदी घोडे नाचवत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी विशाल पाटील हे ऐन गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज न देता रजेवर गेले होते. गणेशोत्सवामध्ये महामार्गावरील होणारी वाहतूककोंडी आणि अपघाताची शक्यता या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रजेवर न जाता दिलेले केंद्र संभाळायचे होते, मात्र डॉ. पाटील यांनी हा आदेश न जुमानता येथून निघून गेले होते. ही बाब एका अपघातानंतर लक्षात आली होती. त्या वेळीदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने डॉ. पाटील पुन्हा कामावर रुजू झाले होते. आता सोमवार, ३ आॅक्टोबरपासून पाटील रजेवर आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता डॉ. पाटील यांचा रजेचा अर्ज आला नसल्याचे सांगण्यात आले. दासगावमधील रामा निर्मळ यांचा मुलगा सूरज निर्मळ याला विंचूदंश झाल्यानंतर त्याला दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टर जागेवर नसल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे मुलाला खाजगी रुग्णालयात न्यावे लागले. घटनेनंतर ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी केली असता डॉ. पाटील रजेवर गेल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले. या ठिकाणी अन्य कोणताही सह डॉक्टर उपलब्ध नसल्याने गत सोमवारपासून रुग्णांचे हाल होत आहेत. शासकीय सेवा असूनदेखील ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. (वार्ताहर)डॉ. विशाल पाटील विनापरवानगी अनधिकृतपणे रजेवर गेले आहेत. त्यांना रजेवर न जाण्याचे सांगण्यात आले होते. या रजेचा पगार देण्यात येणार नसून त्यांच्यावर यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी दुसऱ्या डॉक्टरांची सोय करण्यात येईल.- शैलेश घालवडकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारीदासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने या ठिकाणी अपघातातील रुग्णांना उपचारासाठी जवळचे आरोग्य केंद्र आहे. विभागातील गरीब जनता या आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या संख्येने उपचार घेत आहे. डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. प्रशासनाने यांची गांभीर्याने दखल घ्यावी व या ठिकाणी ताबडतोब डॉक्टरांची सोय करण्यात यावी अन्यथा दासगाव ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील. - पांडुरंग सूर्यकांत निवाते, ग्रामस्थ, दासगाव