शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

मडके कारागीर, व्यावसायिकांना आले सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:47 AM

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमती ३० ते ४० टक्क्यांनी वधारल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपाली : जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे फ्रीजपेक्षा मातीच्या मडक्यातील  थंडगार पाण्याला अनेक जण पसंती देत आहेत. त्याचबरोबर पोपटी बनविण्यासाठी मडके हे प्रथम जिन्नस आहे. त्यामुळे सध्या मातीच्या मडक्यांना खूप मागणी आहे. परिणामी मडके बनविणाऱ्या कारागीर, विक्रेते व व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या  वर्षीच्या तुलनेत यंदा किमती ३० ते ४० टक्क्यांनी वधारल्या आहेत.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. यंदा दिलासादायक स्थिती आहे. पोपटीसाठी मडक्यांना अधिक मागणी आहे. त्यामुळे व्यवसाय चांगला होत असल्याचे कारागीर नारायण कुंभार यांनी सांगितले. विविध आकार, रंग, पोत व किमतीची असलेली मडकी बाजारात उपलब्ध आहेत. लहान, मध्यम व मोठ्या आकारात  मडके मिळते. त्याबरोबरच नळाचा कॉक लावलेले, झाकण असलेली,  विविध रंगांनी नक्षीकाम केलेली मडकी देखील उपलब्ध आहेत.  त्यांच्या किमती, आकार आणि त्यावरील नक्षीकामावर ठरतात. खालून गोल असलेल्या मडक्यांसाठी स्टॅँडची गरज असते. हे स्टँड देखील सध्या ७०- ८० रुपयांत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 

कामगार खूश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परराज्यातून किंवा शहरातून मडके विक्रेते आले नसल्याने स्थानिक कारागीर व विक्रेत्यांच्या व्यवसाय तेजीत आली आहे.

मातीचे मडके आणि विविध वस्तूंना सध्या खूप मागणी आहे. माती सहज उपलब्ध होत नाही.  परिणामी भाव वाढले आहेत; मात्र पोपटी व गार पाण्यासाठी मडके खरेदी वाढली आहे.      - शिल्पा कुंभार, विक्रेत्या, पाली 

मडक्यांचे भाव     २०२०    २०२१नळ असलेले मोठे     २००    २५०नळ लावलेले छोटे     १२०    १५० ते १८०मोठे बिन नळवाले     १५०     २०० छोटे मडके     १००     १५० 

 

टॅग्स :Raigadरायगड