नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
By वैभव गायकर | Updated: May 6, 2024 21:58 IST2024-05-06T21:57:41+5:302024-05-06T21:58:02+5:30
'१९९० मध्ये विमानतळ होणार स्वप्न पहिले होते, पण प्रत्यक्षात विमानतळ साकारण्याचे काम मोदीजींनी केले.'

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
वैभव गायकर/पनवेल: डिसेंबर अखेरीस विमानतळाचे काम पूर्ण होईल आणि जेव्हा विमान येथून उडेल त्यावेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे (दि.6 रोजी) झालेल्या भव्य जाहीर प्रचार सभेत दिली.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मैदानावर झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अरुण भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी,ब्रिजेश पटेल,अल्पसंख्याक समाजाचे जिल्हाध्यक्ष मन्सूर पटेल, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले कि, १९९० मध्ये विमानतळ होणार स्वप्न पहिले होते, पण प्रत्यक्षात विमानतळ साकारण्याचे काम मोदीजींनी केले. मेट्रो, विमानतळाच्या कामाचा पाठपुरावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आणि त्यांना खासदार श्रीरंग बारणे यांची साथ मिळाली. भूमिपुत्रांना सोबत घेऊन येथील चित्र विकासात बदलण्याचे काम झाले असून अटल सेतूमुळे मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. पनवेल महानगरपालिकेला अमृत योजना असू द्या किंवा जीएसटीचा परतावा मिळवून द्यायचा श्रेय मला ते देत असले तरी खरा श्रेय आमदार