मुरुड किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन, वन विभाग, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 01:27 AM2020-09-01T01:27:56+5:302020-09-01T01:28:23+5:30

डॉल्फिनचा मृत्यू खोल समुद्रातच झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर, तो वाहत वाहत मुरुड समुद्र किनारी आला होता.

Dead dolphin found on Murud beach, cremated by forest department, municipal staff | मुरुड किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन, वन विभाग, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार

मुरुड किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन, वन विभाग, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार

Next

- संजय करडे
मुरुड : सोमवारी सकाळी भरतीच्या वेळी चार फूट लांबीचा आणि सुमारे ६० किलो वजनाचा डॉल्फिन मासा मुरुड समुद्र किनाºयावर वाहून आला. या मृत डॉल्फिनमुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती. डॉल्फिनला पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनारी एकच गर्दी केली होती. वन विभाग आणि नगरपालिकेच्या कर्मचाºयांनी मृत झालेल्या डॉल्फिनला वाळूमध्ये पुरले.

मृत डॉल्फिनचा रंग काळा होता. तपासामध्ये ती मादी असल्याचे स्पष्ट झाले. डॉल्फिनचा मृत्यू खोल समुद्रातच झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर, तो वाहत वाहत मुरुड समुद्र किनारी आला होता. डॉल्फिन मोठा असल्याने अनेक जणांनी हा मासा पाहण्यासाठी गर्दी केली होती. माशाच्या मृत्यूबाबत प्राणिमित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मुरुड समुद्र किनारी गेल्या वर्षभरात किमान पाच मोठे मृत डॉल्फिन आले होते. त्यामुळे याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन, यावर काहीतरी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी प्राणिमित्रांकडून होत आहे. खरे तर डॉल्फिन मासा विदेशात व भारतात पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. या घटनेची वन विभागाला माहिती समजताच, नगरपालिकेच्या कर्मचाºयांची मदत घेत, त्यांनी डॉल्फिनला समुद्रातील वाळूत खोल खड्डा करून पुरण्यात आले.

डॉल्फिन हा समुद्रातील संरक्षित जातीतील मासा आहे. रीतसर पंचनामा करून मृत डॉल्फिनचे शवविच्छेदन करून त्याला पुरण्यात आले आहे.
- प्रशांत पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी,
वन विभाग, मुरुड

या डॉल्फिनला डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या माशाचा मृत्यू चार ते पाच दिवस अगोदरच झाला आहे. त्यामुळे याची सडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. समुद्रच्या तळाशी असणाºया खडकावर आढळून हा अपघात झाला असेल, अशी शक्यता आहे.
- डॉक्टर सुदर्शन पाडावे,
पशू वैद्यकीय अधिकारी, मुरुड तालुका

Web Title: Dead dolphin found on Murud beach, cremated by forest department, municipal staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड