जयंत धुळप /अलिबागअतिसंरक्षीत श्रेणीतील 'ऑलिव्ह रिडले 'जातीचे पूर्ण वाठीचे मृत कासव शनिवार (5 मे) सकाळी अलिबाग जवळच्या वरसोली समुद्र किनारी भरतीच्या लाटांसोबत वाहत आले आहे. वरसोली किनाऱ्यावरील मृत कासव वाहत येण्याची ही गेल्या महिनाभरातील दुसरी घटना आहे.सध्या या कासवांचा विणीचा हंगाम आहे. या काळात अंडी घालण्याकरिता कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर येतात. या प्रवासादरम्यान मोठ्या जहाजांचे पंखे आणि मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकून ही कासवे जखमी होतात आणि समुद्र तळास जाऊन गुदमरुन मृत्यूमुखी पडून वाहत समुद्र किनारी येत असतात. पर्यावरण अभ्यासकांमध्ये हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.
वरसोली(अलिबाग) समुद्र किनारी पुन्हा मृत कासव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2018 2:38 PM