पॅराशूटमधून पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:48 AM2019-05-26T05:48:11+5:302019-05-26T05:48:15+5:30
मुरूड समुद्रकिनारी चारचाकी वाहनाच्या सहाय्याने पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बाप-लेक खाली पडून अपघात झाला.
आगरदांडा : मुरूड समुद्रकिनारी चारचाकी वाहनाच्या सहाय्याने पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बाप-लेक खाली पडून अपघात झाला. उडवताना श्निवारी घडलेल्या या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. तर वडील जखमी झाले आहेत.
पुण्यातील सात जणांचा गट मुरुड समुद्रकिनारी पर्यटनासाठी आला होता. शनिवारी गणेश पवार (४०) त्यांचा मुलगा वेदान्त (१५) हे पॅराशूटने हवाई सफारीची मजा घेत होते. दोघे जमिनीवर आपटल्याने गंभीर जखमी झाले. वेदान्तच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या नाक व कानातून रक्तस्राव होऊ लागला. त्यांना अलिबाग सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, वेदान्तला मृत घोषित केले. ते दोघे एकाच पॅराशूटमधून आकाशात उडाले. काही मिनिटांत ते ४० ते ५० फुटांवरून जमिनीवर आपटले. या घटनेची तक्रार नानासाहेब झांबरे यांनी मुरुड पोलिसांत दिली. पोलिसांनी पॅराशूट उडविण्याचा व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
>समुद्राच्या स्पीड बोटीवरून पॅराशूट उडवण्याला मेरी टाइम बोर्डाकडून परवानगी दिली जाते. चारचाकी वाहनांच्या साह्याने पॅराशूट उडवणाऱ्यांना आम्ही परवानगी देत नाही, ते बेकायदेशीर आहे.
हितेंद्र बारापत्रे,मुरुड बंदर निरीक्षक