पर्यटकाचा मृत्यू, घोडा मालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 06:51 AM2023-02-07T06:51:18+5:302023-02-07T06:53:15+5:30

अलिबाग : माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेले मोहम्मद काशिद इम्तियाज शेख यांचा घोड्यावरून पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी घोडा मालकावर गुन्हा दाखल करण्यात ...

Death of tourist, case registered against horse owner | पर्यटकाचा मृत्यू, घोडा मालकावर गुन्हा दाखल

पर्यटकाचा मृत्यू, घोडा मालकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

अलिबाग : माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेले मोहम्मद काशिद इम्तियाज शेख यांचा घोड्यावरून पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी घोडा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेख हे २५ जानेवारीला घोड्यावरून पडून जखमी झाले होते. २९ जानेवारीला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी लहू शिंगाडे (रा. मोहाचीवाडी नेरळ, ता. कर्जत) या घोडा मालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद हे पत्नी व मित्रांसह माथेरानमध्ये फिरण्यासाठी आले होते. ते घोडेस्वारी करत हार्ट पॉइंटच्या दिशेने निघाले होते. त्या वेळी शेख यांचा घोडा अचानक जोरात पळायला लागला. मोहम्मद यांचे घोड्यावरील नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले.  त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना उल्हासनगरमध्ये रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Death of tourist, case registered against horse owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.