अलिबागच्या कारागृहात एका आरोपीचा मृत्यू

By admin | Published: October 26, 2015 02:22 AM2015-10-26T02:22:39+5:302015-10-26T02:22:39+5:30

येथील जिल्हा कारागृहातील एका आरोपीचा अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली

Death of one of the accused in Alibaug Jail | अलिबागच्या कारागृहात एका आरोपीचा मृत्यू

अलिबागच्या कारागृहात एका आरोपीचा मृत्यू

Next

अलिबाग : येथील जिल्हा कारागृहातील एका आरोपीचा अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. नागेश शानभाग (वय ६४) असे मृत पावलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा दावा जिल्हा कारागृह प्रशासनाने केला आहे. शानभागला शनिवारी त्याला रुग्णालयात आणले, तेव्हा तो मृत पावला होता, अशी माहिती जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. ननावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शानभागचा मृतदेह त्यानंतर शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असून, त्याबाबतचा अहवाल जिल्हा कारागृह प्रशासनाला रुग्णालय व्यवस्थापन परस्पर कळविणार असल्याचेही डॉ.ननावरे यांनी स्पष्ट केले. शानभाग हा मुंबईतील राहणारा असून, त्याच्या अंत्यविधीसाठी त्याच्या पत्नीला मुंबईमध्ये नेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारा पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक एस.एच. व्हराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Death of one of the accused in Alibaug Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.