शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

एसटीच्या धडकेने पादचा-याचा मृत्यू, चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:39 AM

भरधाव वेगात जाणा-या एसटीने आवेटी, आदिवासीवाडीत राहणारे महादेव बाळाराम नाईक (३८) यांना धडक दिल्याने ते बसच्या मागच्या टायरखाली आले.

नागोठणे : भरधाव वेगात जाणा-या एसटीने आवेटी, आदिवासीवाडीत राहणारे महादेव बाळाराम नाईक (३८) यांना धडक दिल्याने ते बसच्या मागच्या टायरखाली आले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास नागोठणे - पोयनाड मार्गावर चोळे गावाचे हद्दीत घडला.रोहे आगाराचे चालक भरत कोळेकर ( रा. खारी, रोहे, मूळ रा. कोंडगाव घोडा, जिल्हा बीड) हे एमएच १४ बीटी १४१३ या क्र मांकाची नागोठणे - पोयनाड बस घेऊन सकाळी साडेनऊ वाजता नागोठणे बसस्थानकातून मार्गस्थ झाले होते. ही बस १० वाजून ५ मिनिटांनी या मार्गावरील चोळे गावाचे हद्दीत आली असता भरधाव बसने महादेव नाईक या पादचाºयाला जोरदार धडक दिल्याने नाईक जागीच ठार झाले. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दुपारच्या दरम्यान चालक कोळेकर याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पो. उपनिरीक्षक दिलीप पालवणकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात