नागेश्वरी नदी बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: July 28, 2016 03:46 AM2016-07-28T03:46:55+5:302016-07-28T03:46:55+5:30
तुडील येथील इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा नागेश्वरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. घरी जाण्याच्या मार्गावर विरुद्ध दिशेला हा विद्यार्थी नदीत बुडाल्याने या विद्यार्थ्याचा
दासगाव/महाड : तुडील येथील इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा नागेश्वरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. घरी जाण्याच्या मार्गावर विरुद्ध दिशेला हा विद्यार्थी नदीत बुडाल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे. असद इनायत बीया (१६, रा. चिंभावे) असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.
असद बीया हा विद्यार्थी तुडील येथील हसनखान देशमुख व पाशा मिया खतीब उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होता. मंगळवारी २६ जुलै रोजी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तो घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी असदचा मृतदेह शाळेशेजारीच रावढळ गाव हद्दीत नागेश्वरी नदीच्या पात्रात सापडला. या प्रकरणी मुश्ताक बीया यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार असद हा शाळा सुटल्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी त्याचा पाय घसरून नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तर शाळेत काही विद्यार्थ्यांच्यात वाद झाला आणि या वादामुळे तणावाखाली येवून असदने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
घरी जाण्याचा मार्ग आणि घटनास्थळ हे दोन्ही बाजूला असल्याने गावातील या चर्चेला पुस्ती मिळत आहे. मात्र मृत असदच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस तपास करत आहेत.(वार्ताहर)
घरी जाण्याचा मार्ग आणि घटनास्थळ हे दोन्ही बाजूला असल्याने गावातील या चर्चेला पुस्ती मिळत आहे. मात्र मृत असदच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.