पनवेल : पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आदींसह नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित होते. दीड कोटी रुपये खर्चून महाराजांच्या पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. ते पूर्णत्वास आले आहे. या सुशोभीकरणात ५२८ चौरस मीटर जागेत १०० मीटरदगडांचा चौथरा बांधण्यात आलेला आहे. सुमारे २२ शिल्पेदेखील या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले, पनवेल शहर वाढतेय, नागरिकांना आवश्यक काय आहे ते देण्याचे काम महापालिकेकडून होत आहे. शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळा आदर सर्वांच्या मनात आहे. पनवेलच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा हा सुशोभीकरण प्रकल्प आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून येथे शिवकाल, गड-किल्ले स्मरणात यावे असे काम झाले आहे, त्याबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकाऱ्यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया दिली. शिवसृष्टी दर्जेदारपणे साकारली गेली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार काम पूर्ण झाले असून, शिवकालीन काळ अनुभवायला मिळणार आहे ही पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण, पनवेलमध्ये कार्यक्रमपनवेल : पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आदींसह नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित होते. दीड कोटी रुपये खर्चून महाराजांच्या पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. ते पूर्णत्वास आले आहे. या सुशोभीकरणात ५२८ चौरस मीटर जागेत १०० मीटर दगडांचा चौथरा बांधण्यात आलेला आहे. सुमारे २२ शिल्पेदेखील या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले, पनवेल शहर वाढतेय, नागरिकांना आवश्यक काय आहे ते देण्याचे काम महापालिकेकडून होत आहे. शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळा आदर सर्वांच्या मनात आहे. पनवेलच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा हा सुशोभीकरण प्रकल्प आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून येथे शिवकाल, गड-किल्ले स्मरणात यावे असे काम झाले आहे, त्याबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकाऱ्यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया दिली. शिवसृष्टी दर्जेदारपणे साकारली गेली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार काम पूर्ण झाले असून, शिवकालीन काळ अनुभवायला मिळणार आहे ही पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.नव्याने केलेले सुशोभीकरण पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शिवाजी चौकात भेट देत आहेत. नव्याने केलेले सुशोभीकरण पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शिवाजी चौकात भेट देत आहेत.
नागरिकांची मोठी गर्दीशिवाजी चौकाच्या सुशोभीकरणामुळे पनवेलच्या वैभवात भर पडली आहे. नव्याने केलेले सुशोभीकरण पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शिवाजी चौकात भेट देत आहेत.