लोकसहभागातून गाढी नदी संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:02 AM2019-12-30T01:02:16+5:302019-12-30T01:02:20+5:30

पनवेलमध्ये बैठक; गावागावांत २६ जानेवारीपासून मोहीम

Deep river conservation through public participation | लोकसहभागातून गाढी नदी संवर्धन

लोकसहभागातून गाढी नदी संवर्धन

Next

पनवेल : गाढी नदी वाचवू या या उपक्रमातून गाढी नदीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे, पण यासाठी सर्वांनी मोहिमेत सहभाग घेणे गरजेचे असून गाढी नदीच्या संरक्षण व विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी खांदा वसाहतीत केले. गाढी नदी संवर्धनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

गाढी नदीचे पात्र स्वच्छ व सांडपाणी मुक्त ठेवणे आणि घनकचरा व्यवस्थापनेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी पंचायत समिती सभापती प्रणाली भोईर, उपसभापती वसंत काठावले, जिल्हा परिषद सदस्य अमीत जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, गटविकास अधिकारी तेटगुरे आदी उपस्थित होते. बैठकीत नितीन कानिटकर यांनी गाढी नदी वाचवू या उपक्रमाची थोडक्यात ओळख करून दिली.

सुमीत यांनी, अभियानाचा आत्तापर्यंतचे प्रवास, श्रमदान आणि त्यांचे नियोजन, त्यामागची भूमिका यांचे फोटोंसह सादरीकरण केले. यावेळी निधी नसणे, जागा उपलब्ध नसणे, मार्गदर्शन नसणे आदी ग्रामपंचायतीच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. नदीची स्वच्छता व नदीत कचरा, निर्माल्य पडू नये, यासाठी लोकांना पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने गाढी नदीवरील चिपळे पुलाजवळ निर्माल्य कलश बसविण्यात आला. त्याच अनुषंगाने २६ जानेवारीपर्यंत गावोगावी निर्माल्य कलश, घंटागाडी आणि कचराकुंडी यांची व्यवस्था करण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केले. त्याचबरोबरीने घनकचरा व्यवस्थापन, ओला कचऱ्यापासून खत निर्मिती, आदी विषयांवर पंचायत समिती, प्रशासन आणि ग्रामपंचायत एकत्रितपणे उपाययोजना करतील, अशी सकारात्मक भूमिका पुढे आली.

Web Title: Deep river conservation through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.