शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

लोकसहभागातून गाढी नदी संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:02 AM

पनवेलमध्ये बैठक; गावागावांत २६ जानेवारीपासून मोहीम

पनवेल : गाढी नदी वाचवू या या उपक्रमातून गाढी नदीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे, पण यासाठी सर्वांनी मोहिमेत सहभाग घेणे गरजेचे असून गाढी नदीच्या संरक्षण व विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी खांदा वसाहतीत केले. गाढी नदी संवर्धनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.गाढी नदीचे पात्र स्वच्छ व सांडपाणी मुक्त ठेवणे आणि घनकचरा व्यवस्थापनेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी पंचायत समिती सभापती प्रणाली भोईर, उपसभापती वसंत काठावले, जिल्हा परिषद सदस्य अमीत जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, गटविकास अधिकारी तेटगुरे आदी उपस्थित होते. बैठकीत नितीन कानिटकर यांनी गाढी नदी वाचवू या उपक्रमाची थोडक्यात ओळख करून दिली.सुमीत यांनी, अभियानाचा आत्तापर्यंतचे प्रवास, श्रमदान आणि त्यांचे नियोजन, त्यामागची भूमिका यांचे फोटोंसह सादरीकरण केले. यावेळी निधी नसणे, जागा उपलब्ध नसणे, मार्गदर्शन नसणे आदी ग्रामपंचायतीच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. नदीची स्वच्छता व नदीत कचरा, निर्माल्य पडू नये, यासाठी लोकांना पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने गाढी नदीवरील चिपळे पुलाजवळ निर्माल्य कलश बसविण्यात आला. त्याच अनुषंगाने २६ जानेवारीपर्यंत गावोगावी निर्माल्य कलश, घंटागाडी आणि कचराकुंडी यांची व्यवस्था करण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केले. त्याचबरोबरीने घनकचरा व्यवस्थापन, ओला कचऱ्यापासून खत निर्मिती, आदी विषयांवर पंचायत समिती, प्रशासन आणि ग्रामपंचायत एकत्रितपणे उपाययोजना करतील, अशी सकारात्मक भूमिका पुढे आली.