पनवेल देवीचा पाडा येथील दीपाली पाटीलचे सुयश; कर निर्धारण अधिकारीपदावर नियुक्ती
By वैभव गायकर | Published: June 14, 2024 06:14 PM2024-06-14T18:14:36+5:302024-06-14T18:15:36+5:30
कर निर्धारण अधिकारी म्हणून दीपाली लवकरच नगरपरिषदेत नियुक्त होणार आहे.
लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल: महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद राज्य सेवा विभागाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या परीक्षेत पनवेल ग्रामीण मधील दीपाली रामचंद्र पाटील हिने यश संपादन करीत करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदाला गवसणी घातली आहे.या निवडीबाबत
दिपाली रामचंद्र पाटील(27) हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नुकतेच दिपालीचे ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.या परिसंख्येत दीपाली खुल्या गटातुन उत्तीर्ण झाली आहे.दर पाच वर्षांनी हे परीक्षा नगरविकास विभागाच्या वतीने घेतली जाते.सरळ सेवे द्वारे हि भरती झाली आहे.दीपाली पाटील हि राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांसाठी सराव करीत आहे.राज्य सेवा एमपीएससी द्वारा घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी मागील काही वर्षांपासून ती सराव करीत आहेत.गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दिपालीचे शिक्षण झाले आहे.इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर दिपालीने पिल्लई कॉलेज मधून इएनटीसी मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला आहे.कर निर्धारण अधिकारी म्हणून दीपाली लवकरच नगरपरिषदेत नियुक्त होणार आहे.
राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मी मागील काही दिवसांपासून सराव करीत आहे.राज्य सेवा आयोगाच्या तुलनेत मला नगरपरिषद राज्य सेवा विभागाची हि परीक्षा अत्यंत सोपी गेली त्यामुळे मी हे यश प्राप्त केले.असे असले तरी मी राज्य सेवेसाठी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. - दीपाली पाटील