शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कॅन्सरवर मात करून डायलेसिस रुग्णांची सेवा, दीपाली वैभव देशमुख यांना ‘लोकमत स्त्रीशक्ती गौरव’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 4:10 AM

शासकीय आरोग्य सेवेबद्दल सर्वत्र नकारघंटा वाजत असताना रायगड जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस युनिटमध्ये डायलेसिसकरिता येणारे रुग्ण मात्र धन्यवाद देत असतात.

अलिबाग : शासकीय आरोग्य सेवेबद्दल सर्वत्र नकारघंटा वाजत असताना रायगड जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस युनिटमध्ये डायलेसिसकरिता येणारे रुग्ण मात्र धन्यवाद देत असतात. १० आॅगस्ट २००९ रोजी रायगड जिल्हा रुग्णालयात एका डायलेसिस मशिनच्या माध्यमातून प्रथम डायलेसिस सेवा सुरू झाली आणि या पहिल्या दिवसापासून या डायलेसिस युनिटची आजतागायत जबाबदारी डॉ.दीपाली वैभव देशमुख या सांभाळत आहेत. गतवर्षी त्यांना स्वत:ला कॅन्सरसारख्या गंभीर व्याधीला सामोरे जावे लागले. आपल्या स्वत:वरील आठ महिन्यांंच्या उपचारादरम्यान त्यांना स्वत:ला मात्र येथे डायलेसिसच्या रुग्णांचे काय होत असेल याचीच चिंता सतावत होती. आठ महिन्यांच्या उपचारांती स्वत: जिद्दीने उभ्या राहिलेल्या डॉ.दीपाली देशमुख यांनी पुन्हा या डायलेसिस युनिटची जबाबदारी स्वीकारुन ती त्या समर्थपणे सांभाळत आहेत. याच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य सेवेची विशेष दखल घेवून सोमवारी नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी ‘लोकमत-स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार’ जिल्हा रुग्णालयातील त्यांच्या डायलेसिस वॉर्ड या डॉ.देशमुख यांच्या कार्यस्थळीच पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.डॉ.देशमुख म्हणाल्या, १० आॅगस्ट २००९ रोजी डायलेसिस सेवा सुरू झाली. त्यापूर्वी जिल्ह्यातील डायलेसिस गरजू रुग्णांना पनवेल, मुंबई वा पुणे येथे जावे लागत असे आणि हा प्रवास त्यांच्याकरिता जीवावरचाच असे. सद्यस्थितीत येथे चार डायलेसिस मशिन्स आहेत. गेल्या आठ वर्षांत या सरकारी डायलेसिस युनिटच्या माध्यमातून केवळ २२० रुपये सरकारी माफक शुल्कात १ हजार ५९७ रुग्णांना ११ हजार ९९२ वेळा डायलेसिसची सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले. सकाळी ७ ते रात्री ११ अशा वेळेतील चार शिफ्टमध्ये येथे रुग्णांना डायलेसिस सेवा उपलब्ध करुन दिली जात असतानाही, अद्याप १६ डायलेसिस रुग्ण प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यांना डायलेसिस सेवा उपलब्ध करुन देता येत नसल्याची खंत डॉ.देशमुख यांनी सांगितली. त्यावर आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुन पाचवे डायलेसिस मशिन लवकरच येथे उपलब्ध करुन देण्याचे सूतोवाच चित्रलेखा पाटील यांनी यावेळी केले. लोकमतच्या या उपक्रमाचे स्वागत करुन, अशा उपक्रमाच्या माध्यमातून प्रामाणिक सेवा करणाºया डॉक्टरांच्या कौतुकाबरोबरच सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी अखेरीस नमूद केले.यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या समन्वयक डॉ.भक्ती फाफळे-पाटील, रुग्णालयाच्या मेट्रन जयश्री मोरे, डॉ.देशमुख यांच्या युनिटमधील सहकारी नम्रता नाईक, निकिता थळे,प्रज्ञा चोगले, तंत्रज्ञ अतुल पवार, महेश म्हात्रे आदि सर्व आवर्जून उपस्थित होते.हा गौरवसर्व सहकाºयांचाडायलेसिस रुग्णसेवा करीत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु माझ्यासह येथील माझ्या सर्व सहकाºयांनी त्यावर मात करुन अखंड रुग्ण सेवा देण्यात यश मिळवले.या साºया प्रवासात आज माझा ‘लोकमत-स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार’ प्रदान करुन सन्मान के ला, हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही तर माझ्या सर्व सहकाºयांचा आहे.आम्हा सर्वांना याचा मोठा आनंद आहे अशी भावना डॉ.दीपाली देशमुख यांनी व्यक्त केली आहे.